पिशोर, विज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबाची इम्तियाज जलिल यांनी घेतली भेट...
पिशोर येथे वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची इम्तियाज जलील यांनी घेतली भेट
कुटुंबीयांचे सांत्वन करून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
कन्नड | औरंगाबाद, दि. 19 (डि-24 न्यूज) – कन्नड तालुक्यातील वाघूळखेडा(पिशोर) येथे वीज पडून सय्यद कुटुंबातील फरजाना हमीद सय्यद , तस्लिम मुक्तार सय्यद, अलमिरा हनिफ सय्यद या तीन महीलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तीन जण या घटनेत गंभीर जख्मी आहे. या दुःखद घटनेनंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मयतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी इम्तियाज जलील यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास एमआयएम पक्ष त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी एमआयएमचे प्रदेश महासचिव तथा मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, जिल्हाध्यक्ष शारेख नक्षबंदी, जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान पटेल, जिल्हा महासचिव शेख कलीम, जिल्हा महासचिव विकास एडके, जिल्हा उपाध्यक्ष नइम शेख, मेहराज खान, राजू पटेल, पवन गायकवाड, नगरसेवक काकासाहेब काकडे, अमर बिन हैदरा, वाजेद जहागिरदार, सलमान कुरेशी, अमजद खान चाचू, तालुका अध्यक्ष नासेर पटेल, कन्नड शहराध्यक्ष रईस पवार, राजेक शेख, आबेद पिंजारी, मोहम्मद भाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दुःखद प्रसंगी उपस्थितांनी मयतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना धीर दिला. कुटुंबीयांना या कठीण प्रसंगी आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात
आले.
What's Your Reaction?