पोलिस प्रक्षिक्षणार्थी विद्यार्थ्यांची अंबादास दानवेंनी घेतली भेट, केली सरकारवर टीका
पोलिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची अंबादास दानवेंनी घेतली भेट...
राज्यात रझाकारी शासन सुरू असल्याचा केला प्रश्न उपस्थित...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड येथील लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमामुळे रद्द करण्यात आलेल्या कारागृह पोलीस भरतीच्या प्रशिक्षक विद्यार्थ्यांची शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली. ८ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरलेला असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांना अवगत करून राज्यात रझाकारी शासन सुरू आहे का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री यांचा दौरा असल्याचे ८ दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनाला कळविण्यात आले होते. तरीही भरतीच्या दिवशी सकाळीच पोलिस आयुक्त यांनी नोटीस लावून भरती रद्द झाल्याची माहिती दिली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची हेळसांड होईल ही बाब अत्यंत चूकीची बाब आहे. पोलिस आयुक्त यांनी यापुढे भरती पुन्हा कधी सुरू होईल यांची सुद्धा प्रशिक्षणार्थी यांना माहिती नाही. दोन ते तीन दिवस आधी भरती रद्द झाली याची माहिती कळवायला हवी होती. तसेच या विद्यार्थ्यांची शासनाने व्यवस्था केली असल्याची घोषणा केली असली तरीही प्रत्यक्षात कोणती व्यवस्था झाली नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
यावेळी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, शहरप्रमुख विजय वाघचौरे, राजू शिंदे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे व दिपक पवार उपस्थित होते.
What's Your Reaction?