बघा किती सुंदर आहे महापालिका शाळेची इमारत...!
मनपा कें. प्रा. मा. शाळा एन-7 सिडको शाळेच्या इमारतीचे बांधकाम फोरब्स कंपनीच्या सीएसआर फंडातून पूर्ण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय एन सेवन सिडको छत्रपती संभाजीनगर शाळेच्या इमारतीचे बांधकाम फोरब्स कंपनी अँड लिमिटेड शापूरजी पालनजी ग्रुप या कंपनीकडून सीएसआर फंडातून पूर्ण करण्यात आले. 2018 पूर्वी शाळेचे इमारत जुनी होती. तत्कालीन मुख्याध्यापिका हेमलता भुयार यांनी फोरब्स कंपनीशी संपर्क साधून सी एस आर फंड मिळवला.चार टप्प्यात सदरील शालेय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 2018 साली शालेय इमारतीतील चार खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 2022 मध्ये पाच खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 2025 साली सहा खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 2026 साली सात वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. अशाप्रकारे 22 वर्ग खोल्यांनी सुसज्ज सुंदर अशी इमारत ऑक्टोबर 2026 आली पूर्ण करण्यात आली. सदरील शालेय इमारतीचे बांधकाम अंदाजे एकूण सात कोटी रुपयांचे आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. डी मार्ट एज्युकेशन फाउंडेशन द्वारे नवीन शालेय इमारतीमध्ये वीस संगणकांचे प्रयोगशाळा उपलब्ध झाली आणि विद्यार्थ्यांना संगणक शिकवणारे शिक्षक देखील उपलब्ध झाले. तसेच डी मार्ट एज्युकेशन फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना 2000 पुस्तकांची लायब्ररी प्राप्त झाली. लायब्ररीयन म्हणून एक शिक्षक देखील नियुक्त करण्यात आला.प्रशासन अधीकारी संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक मनोज अग्रवाल यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी ऑगस्ट 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे मोफत सिटी बसेस सुरू करण्यात आल्या. मंगला महाजन शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील एक विद्यार्थीनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन येथे अभ्यास दौऱ्यासाठी 2025मध्ये गेली होती.2021 मध्ये वैशाली देशमुख छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे 12 विद्यार्थी यांनी तयार केलेला सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्यासाठी सदरील शाळेचे एक विद्यार्थ्याने निवडण्यात आली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या उपक्रमाचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. सिटी बसेस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्ता यांच्यामध्ये वाढ झाली आहे.
मुख्याध्यापक मनोज अग्रवाल, क्रीडा प्रशिक्षक सागर मगरे, क्रीडा निदेशक प्रीतीश सराटे यांच्या प्रयत्नाने शाळेत क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी प्रगती करत आहेत. शाळेची विद्यार्थिनी श्रुतिका बोळगे हिने वेटलिफ्टिंग मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी आराध्या कुबेर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. शाळेतील विद्यार्थी क्रीडा प्रकारात प्रगती करत आहेत.श्रीमती दीपाली औटे यांच्या मार्गदर्शनाने महात्मा गांधी अखिल भारतीय साहित्य संमेलनात शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्राजक्ता शामस्कर हिने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे 6000 रुपये रकमेचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळवले. शाळेची सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे.
What's Your Reaction?