विदेशात निधन पावलेल्या युवकाचे पर्यावरणपुरक शवदाहिनीत श्रध्देपूर्वक अंत्यसंस्कार...

विदेशात निधन पावलेल्या युवकाचे पर्यावरणपूरक शवदाहिनीत श्रद्धेपूर्वक अंत्यसंस्कार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - येथील अपराजित, एस.टी. कॉलनी, एन-2, सिडको परिसरातील रहिवासी विराज विनोद बहादे (वय 17) यांचे दुःखद निधन दिनांक 23 जुलै 2025 रोजी अमेरिकेतील Johns Hopkins Hospital, बाल्टिमोर, मेरीलँड येथे उपचार घेत असताना झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. हे अंत्यसंस्कार मुकुंदवाडी येथील स्मशान भूमीत करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक, अक्षयऊर्जेवर चालणाऱ्या प्रदूषणमुक्त शवदाहिनीत पारंपरिक हिंदू विधींप्रमाणे अत्यंत सन्मानपूर्वक व श्रद्धेने करण्यात आले. ही शवदाहिनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाश्वत विकास उपक्रमांतर्गत उभारण्यात आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक धार्मिक विधींना कोणतीही बाधा न येता पर्यावरणाची देखील विशेष काळजी घेतली जाते. कमी धूर आणि राख निर्माण करणाऱ्या या प्रणालीमुळे परिसरात स्वच्छता व शुद्धतेचा अनुभव मिळतो.
या अंत्यसंस्कार प्रसंगी पालकमंत्री श्री. संजय शिरसाट, आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी स्व. विराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.या ठिकाणी जवळपास आता पर्यंत 29 अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






