अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार कुरेशी समाज...

 0
अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार कुरेशी समाज...

अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार कुरेशी समाज...

व्यापार एक महीन्या पासून बंद, कायदेशीर व रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा जमीयतूल कुरेशच्या काॅनफरन्समध्ये निर्णय...हजारोंच्या संख्येने उपस्थिती...गृह राज्यमंत्री यांना दिले होते निवेदन..

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)

राज्यात गोवंश कायदा अधिक कडक करुन गोवंश हत्या करताना वारंवार गुन्हा कोणी केला तर कायदा अधिक कडक करुन मोका अंतर्गत कार्यवाई केली जात आहे. बंदी नसलेली जनावरांची गाडी अडवून व्यापा-यांसोबत मारहाणीच्या घटना अधिक वाढत आहे. गुन्हे दाखल केली जात असल्याने समाजावर अन्याय वाढत असल्याने एका महीन्यात पासून राज्यात जनावरांची खरेदी बंद करुन बीफ विक्रीची दुकाने बंद करुन जमीयतूल कुरेशी, महाराष्ट्रने आंदोलन पुकारले आहे. आज हज हाऊसच्या सभागृहात जमीयतूल कुरेशच्या वतीने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय काॅनफरन्सचे आयोजन करण्यात आले. या काॅनफरन्समध्ये न्यायालयीन लढाई लढणार त्यासोबत समाजकंटकांना पायबंद करावे व विविध मागणीसाठी कृती समीतीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार. जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने शेतक-यांना सोबत घेवून करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या काॅनफरन्समध्ये बेरोजगार झालेले हजारोंच्या संख्येने व्यापारी, कामगार उपस्थित होते. जमीयतूल कुरेशचे मराठवाडा अध्यक्ष हाजी इसा कुरेशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गर्दी एवढी वाढली असल्याने सभागृहा बाहेर स्क्रीन लावण्यात आली होती.

भाकड जनावरे कशी सांभाळायची हा मोठा प्रश्न शेतक-यासमोर आहे. एका महीन्यात पासून राज्यातील कुरेशी समाजा सोबत विना कारण जनावरांच्या गाड्या अडवून गुन्हे दाखल केले जात आहे. समाजकंटक मारहाण करत कायदा हातात घेतात त्यांच्यावर कार्यवाही होत नाही उलट बंदी नसलेल्या जनावरांची वाहतूक करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल केली जात आहे. व्यापार करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला सुध्दा दिला आहे. कायद्याचे पालन करुन व्यवसाय केला तरीही नाहक त्रास दिला जात असल्याने व्यवसाय बंद करावा लागला. सरकारने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा यासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय काॅनफन्समध्ये घेतला असल्याची माहीती पत्रकार परिषदेत जमीयतूल कुरेशचे मराठवाडा अध्यक्ष हाजी इसा कुरेशी यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले जनावरांचे व्यापार करणा-यांना आर्थिक फटका व विना कारण इजा पोहचवण्याचे प्रकार वाढत आहे. पोलिसांकडूनही त्रास दिला जात असल्याने जनावरांची खरेदी शेतक-यांकडून बंद केली. बिफ विक्रीची दुकाने बेमुदत बंद केल्याने लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे. दरदिवशी कोट्यावधींची उलाढाल असलेल्या मीट इंडस्ट्रीला या बंदचा फटका बसत असल्याने विदेशात निर्यात बंद असल्याने महसूल बुडत आहे. जनावरांचे बाजार खरेदी विक्री होत नसल्याने ओस पडली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शहरातील हज हाऊस येथे जमीयतुल कुरेशचे मराठवाडा अध्यक्ष हाजी इसा कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय काॅनफरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात मुस्लिम, दलित व शेतकरी बांधव सोबत असल्याची माहीती हाजी इसा कुरेशी यांनी दिली. कायदेशीर लढाई लढणार व सरकारवर दबाव वाढवण्यासाठी कृती समीतीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यावर एकमत झाले. यावेळी कुरेशी समाजाची एकजुट दिसून आली. शेतक-यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे जाहिर केले. कुरेशी समाजातील व्यापा-यांची सहनशक्ती आता संपत आली आहे. पोटापाण्याचा प्रश्न लाखो लोकांसमोर निर्माण झाला आहे. शेतकरी वर्ग भाकड जनावरांना सांभाळण्यासाठी अडचणीत आले आहे. सरकारने आमचा नाही तर त्यांचा तरी विचार करावा. कुरेशी समाज आता एकजुट झाला आहे. कृती समीती स्थापन करुन कायदेशीर व रस्त्यावरची लढाई भविष्यात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे कलिम कुरेशी यांनी सांगितले. यावेळी.

यावेळी हाजी अयूब कुरेशी, मजीद कुरेशी, कदीर मौलाना, जावेद कुरेशी, एड फहीम कुरेशी, सरपंच दाऊद कुरेशी, मजीद कुरेशी, बॅ.हुजेफा कुरेशी, मुफ्ती अनिसुर्रहमान, सिराज कुरेशी, नौशाद कुरेशी आदी उपस्थित होते. सुत्र संचालन अकिल कुरेशी यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow