टाकसाळ स्मृती व्याख्यानात तीस्ता सेटलवाड...!

 0
टाकसाळ स्मृती व्याख्यानात तीस्ता सेटलवाड...!

टाकसाळ स्मृती व्याख्यानात तीस्ता सेटलवाड ! औरंगाबाद,दि.23(डि-24 न्यूज) ज्येष्ठ स्वातंञ्यसैनिक काॅ अॅड मनोहर टाकसाळ यांच्या द्वितीय स्मृती दिना निमित्त "लोकशाही समोरील वाढती आव्हाने" या विषयावर गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 23 रोजी सायंकाळी 5 वाजता सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड व भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ राम बाहेती यांचे व्याख्यान जिजाऊ मंदीर, म्हाडा काॅलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ आयोजित करण्यात आले आहे. याबाबत असे की, हैद्राबाद मुक्ती संग्रामात योगदान असलेले, कष्टकरी,श्रमिकांच्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी अनेकवेळा पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाणारे, अनेकवेळा तुरुंगवास भोगलेले, नामांतराच्या आंदोलनात अग्रभागी राहुन तुरुंगवास भोगणारे, मराठवाडा विकास आंदोलनात, रेल्वे ब्राॅड गेज आंदोलनात गोविंदभाई श्राॅफ यांच्यासोबत सक्रीय असणारे, महागाई , बेरोजगारी विरोधात अनेकदा जेलमध्ये जाणारे, न्यायालयात गरीबांचा वकील म्हणुन कोणत्याही फीसची अपेक्षा न करता न्याय मिळवुन देणारे, समाजासाठी योगदान देणारे, यासह जनतेच्या अनेक प्रश्नांवर आंदोलन केलेले ज्येष्ठ स्वातंञ्यसैनिक काॅ अॅड मनोहर टाकसाळ यांच्या द्वितीय स्मृती दिना निमित्त गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता पैठणगेट येथुन अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे, तसेच सायंकाळी 5 वाजता जिजाऊ मंदीर, म्हाडा काॅलनी, बाबा पेट्रोल पंप जवळ येथे "लोकशाही समोरील वाढती आव्हाने" या विषयावर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड व कामगार नेते काॅ राम बाहेती यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा डाॅ वासुदेव मुलाटे हे असणार आहेत. अभिवादन रॅलीत व व्याख्यानासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ स्वातंञ्यसैनिक काॅ अॅड मनोहर टाकसाळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष स. सो .खंडाळकर, सरचिटणीस काॅ भिमराव बनसोड, उपाध्यक्ष : अॅड. वैशाली डोळस, सहसचिव प्रा. भारत शिरसाठ, सदस्य सुभाष लोमटे, अॅड. रमेशभाई खंडागळे, अॅड. के ई. हरिदास, अॅड अभय टाकसाळ यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow