हर्सुलमध्ये गौतमी पाटीलची लावणी, कुस्त्यांची भव्य दंगल

 0
हर्सुलमध्ये गौतमी पाटीलची लावणी, कुस्त्यांची भव्य दंगल

हर्सुलमध्ये गौतमी पाटीलची लावणी, कुस्त्यांची भव्य दंगल

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) दरवर्षीप्रमाणे हर्सुल येथे हरसिध्दिमाता मंदिर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डि-24 न्यूजला हरसिध्दिमाता व्यायाम शाळा व समस्त गावकरी यांचे सल्लागार माजी नगरसेवक पूनमचंद बमने(पहेलवान) यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले प्रसिद्ध लावणी सामाग्री गौतमी पाटीलचे लावणी कार्यक्रम 27 नोव्हेंबर, सोमवारी, सायंकाळी 6 वाजता भगतसिंगनगर, न्यू हायस्कूलच्या बाजूला, हर्सुल, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून भव्य कुस्त्यांची दंगल हरसिध्दिमाता मैदानावर होईल. दहा रुपये ते दहा लाखांपर्यंत इनामाची कुस्ती होणार आहे. दिग्गज पहेलवान गोलू पहेलवान गोलू पहेलवान यांचा पठ्ठा आंतरराष्ट्रीय पहेलवान मिर्झा ईरानी यांचा मुकाबला गोविंद तात्या पवार यांचा पठ्ठा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांची प्रमुख कुस्ती होणार आहे.

कुस्ती प्रेमींसाठी हि आनंदाची बातमी आहे.

29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता घोड्यांचे नाचकाम, पशुप्रदर्शन, हेल्यांची सगर हरसिध्दिमाता आखाडा मैदानावर होईल. सायंकाळी सहा वाजता शिवाजी मैदानावर ऑर्केस्ट्रा चे आयोजन केले आहे यामध्ये सैराट चित्रपटातील मराठी कलाकार उपस्थित राहणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी हर्सुल तालाव येथे सकाळी 10 वाजता घोड्यांची रेस, मोटारसायकल रेस होईल.

3 डिसेंबर 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा सकाळी 5 वाजता हरसिध्दिमाता मंदिर पासून 5KM, 10KM साठी स्पर्धा होतील. भरगच्च कार्यक्रमाचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन हरसिध्दिमाता मंदिर व व्यायाम शाळा आणि समस्त गावकरी हर्सुल यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow