मराठवाड्यात एक व्यक्ती मयत, 33 जनावरे दगावली तर 20 क्विंटल कापूस जळाला

मराठवाड्यात एक व्यक्ती मयत, 33 जनावरे दगावली, 20 क्विंटल कापूस जळाला
पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे...
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे एक व्यक्ती मयत झाले आहे तर 23 लहान व 9 मोठी जनावरे दगावली तर फुलंब्री तालुक्यातील मौजे धामणगाव येथील नाना श्रीपत वाहूल यांच्या घराजवळ वीज पडल्याने गृहोपयोगी वस्तू व अंदाजे 20 क्विंटल कापूस जळाला तर जीवितहानी झाली नाही. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.
विभागीय आयुक्त यांच्याकडून डि-न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार
विभागात 40 मीमी पाऊस पडला आहे तर कोठे वीज पडून तर अतिवृष्टीमुळे जनावरे दगावली आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात 60.8 मीमी पाऊस, 32 मंडळात अतिवृष्टी, मयत जनावरे मोठी 5, 4 गाय एक बैल, 3 शेळ्या मृत्यूमुखी पडले.
जालना जिल्ह्यात 70.7 मीमी पाऊस, तर 27 मंडळात अतिवृष्टी, मयत जनावरे मोठी 3, 1 बैल, 1 गाय, 1 म्हैस, लहान 15 मेंढ्या,
परभणी येथे 65.0 मीमी पाऊस पडला तर 23 मंडळात अतिवृष्टी झाली.
हिंगोली जिल्हा येथे 65.8 मीमी पाऊस पडला 12 मंडळात अतिवृष्टी झाली.
एक इसम मयत झाले आहे.
एक वासरु तर 2 शेळ्या दगावली आहेत.
नांदेड जिल्हा येथे 36 मीमी पाऊस पडला तर 12 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. एक म्हैस 2 शेळ्या दगावली.
बीड जिल्हा येथे 27.2 मीमी पाऊस पडला एका मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
लातूर जिल्हा येथे 1.5 मीमी पाऊस पडला आहे येथे पावसाचे प्रमाण कमी आहे.
उस्मानाबाद जिल्हा येथे पाऊस पडला नाही.
अवकाळी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होईल. काही नदी नाल्यात पाणी आले तर कोरडे पडलेल्या काही तलावात पाणी साचले आहे.
What's Your Reaction?






