बाबरा येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त...
बाबरा येथे 24 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त...!
विक्रीच्या उद्देशाने साठा बाळगणाऱ्या एकाविरुद्ध वडोदबाजार पोलिसांत गुन्हा दाखल; पोलीस पथकाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26 (डि-24 न्यूज) :- फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध वडोदबाजार पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 24 हजार 260 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास बाबरा येथील फुलंब्री ते नाचनवेल रोडवर ही कारवाई करण्यात आली. विलास अंबादास राऊत (वय 35, रा. बाबरा, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने साठवून बाळगताना आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल :
राज निवास सुगंधित पानमसाला – 3,500 रुपये
प्रीमियम झेड वन जाफरानी दर्जा तंबाखू – 2,800 रुपये
केसरयुक्त विमल पानमसाला – 2,000 रुपये
व्ही वन जरदा तंबाखू – 750 रुपये
केसरयुक्त विमल पानमसाला – 1,200 रुपये
व्ही वन तंबाखूचे 12 पॉकेट – 960 रुपये
केसरयुक्त विमल पानमसाला – 8,700 रुपये
जीवन बिग तंबाखूचे 29 पॉकेट – 4,350 रुपये
असा एकूण 24 हजार 260 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी फिर्यादी एकनाथ बबनराव मोरे (वय 35, पोलीस अंमलदार, नेमणूक वडोदबाजार पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरसागर, पोलीस अंमलदार सचिन बिडकर, राजू तेलगोटे, एएसआय वाघ, हेड कॉन्स्टेबल गोरे, हेड कॉन्स्टेबल खाकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?