बासित पठाण खूनप्रकरणी दोन आरोपिंना 24 तासात पोलिसांनी केली अटक...!

 0
बासित पठाण खूनप्रकरणी दोन आरोपिंना 24 तासात पोलिसांनी केली अटक...!

बासित पठाण खूनप्रकरणातील दोन आरोपी जेरबंद; 24 तासांत पोलिसांची मोठी कामगिरी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनप्रकरणातील दोन आरोपींना गुन्हे शाखा व जिन्सी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील पंचम बारसमोर अब्दुल बासित हकीम खान (वय 64, रा. कैसर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अब्दुल बासित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 193/2026, कलम 103(1) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने जवळपास 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानुसार मुकेश ऊर्फ मुक्या महेंद्र साळवे (वय 29, रा. जुनी मुकुंदवाडी) आणि विक्की ऊर्फ सोनू मधुकर पाचवणे (वय 22, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक गणेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सचिन वाघाळे, पोउपनि. अभिजित चिखलीकर, अर्जुन कदम तसेच गुन्हे शाखा व जिन्सी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

या संपूर्ण कारवाईस पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, पोलीस उपआयुक्त (झोन-२) रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सिडको विभाग) मनोज पगारे यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास जिन्सी पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow