गंगापूर, लासूर स्टेशन येथे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 12 दुकानांवर कारवाई...!

 0
गंगापूर, लासूर स्टेशन येथे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 12 दुकानांवर कारवाई...!

गंगापूर, लासूर स्टेशन येथे उघड्यावर मांस विक्री करणार्‍या 12 दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.3(डि-24 न्यूज)- गंगापूर व लासूर स्टेशन येथे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 12 दुकानांवर कारवाई करण्यात आली. 

यापैकी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गंगापूर येथील 5 आणि लासूर स्टेशन येथील 1, अशा 6 विनापरवाना चालविण्यात येणाऱ्या दुकानांना सील ठोकण्यात आले.

सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञा सुरसे, प्रशांत अजिंठेकर व कर्मचारी, स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने गुरूवारी गंगापूर व लासूर स्टेशन येथील मांस विक्री करणाऱ्या गंगापूर येथील 8 आणि लासूर स्टेशन येथे 4 अशा एकूण 12 दुकानांची तपासणी केली. तेव्हा गंगापूर येथे विनापरवाना मांसविक्री करणारे 5 आणि लासूर स्टेशन येथील एका दुकानाला सील लावण्यात आले. स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय अन्न विभागाचा परवाना मिळणार असल्याचे यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी दुकानदारांना सूचना दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow