बौद्ध लेणीतील दागिने चोरीप्रकरणी महीलांची टोळी जेरबंद, आणखी दोघींना अटक...

 0
बौद्ध लेणीतील दागिने चोरीप्रकरणी महीलांची टोळी जेरबंद, आणखी दोघींना अटक...

बौद्ध लेणीतील दागिने चोरीप्रकरणी महिलांची टोळी जेरबंद; आणखी दोघींना पकडले

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28(डि-24 न्यूज)- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी येथे आलेल्या महिलांचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीतील आणखी दोघींना बेगमपुरा पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या प्रकरणात यापूर्वी एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले होते. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 25 हजार रुपये आहे.

पोलिसांनी नगरसूल, नेवासा, लासूर आणि वाळूज परिसरात तपास व पाठलाग करून एका अल्पवयीन मुलीसह सपना गौतम काळे (वय 30, रा. जोगेश्वरी झोपडपट्टी, वाळूज) हिला पकडले. यापूर्वी सपना भुसकर भोसले आणि योगिता उमेश काळे या दोन महिलांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 376/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल आहे. अटक केलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, टोळीतील आणखी संशयितांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मारोती मेडवाड, कय्यूम सिद्दीकी, मंगल सोनवणे, संदीप सोर आणि अनिता मोरे यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow