भुमरेंच्या चालकाचा जमीन घोटाळा प्रकरण चिघळले, मुळ मालकाला अटक, चालकावर अटकेची टांगती तलवार...!

 0
भुमरेंच्या चालकाचा जमीन घोटाळा प्रकरण चिघळले, मुळ मालकाला अटक, चालकावर अटकेची टांगती तलवार...!

भुमरेंच्या चालकाचा जमीन घोटाळा प्रकरण चिघळले, मूळ मालकाला अटक, खासदार संदीपान भुमरेंच्या अडचणी वाढल्या, चालकावर अटकेची टांगती तलवार... मागिल दोन वर्षांपासून हे प्रकरण चांगलेच गाजले आहे.‌‌...माजी खासदार इम्तियाज जलिल, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले होते आता या प्रकरणात अटकसत्र सुरू झाले आहे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याने केलेल्या 231 कोटी रुपयांच्या हिबानामाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणात अटकसत्र देखील सुरू झाले आहे. हिबानामा करून देणाऱ्या हैदराबादच्या मालकाला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे. दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता भुमरेंचा चालक जावेद शेख वर सुध्दा अटकेची टांगती तलवार आहे.

जमीन घोटाळा कसा झाला त्याची सविस्तर माहिती...

बहुचर्चित छत्रपती संभाजीनगरमधील हिबानामाप्रकरणी शहर पोलिसांनी आता फास आवळायला सुरुवात केली आहे. 8 दिवसांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि आता पोलिसांनी या प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक केली आहे.

मीर महेमुदअली बशारत अली खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या सर्व प्रकरणात मीर महेमुद अलीची भूमिका महत्त्वाची होती. मीर महेमूद अली खानने एकाच जागेचे दोन लोकांना हिबानामा करून दिल्याचा आरोप आहे. मीर महेमूद यांना आज न्यायालयात जामीन मिळाला आहे. या जमीन प्रकरणात एक हिबानामा संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेखला करून देण्यात आला आहे.

याप्रकरणी परभणीचे वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून मीर महमूद अली खान आणि जावेद शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मीर महेमूद अली खानला अटक केली आहे.

हे प्रकरण हिबानामाचे असले तरी यावरून राजकीय वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. सत्ताधारी खासदार आणि त्यांचा आमदार पुत्राची लिंक असतानाही कारवाई होत असल्याने चर्चा सुरू आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन आता अटक सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशा लढाईच्या राजकारणाची देखील या प्रकरणाला किनार असल्याची चर्चा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow