मतदार यादी पुननिरीक्षण कार्यक्रम, आपल्या घरी येणा-या मतदान केंद्र स्तरीय अधिका-यांना माहिती द्यावी - सरिता चौधरी

 0
मतदार यादी पुननिरीक्षण कार्यक्रम, आपल्या घरी येणा-या मतदान केंद्र स्तरीय अधिका-यांना माहिती द्यावी - सरिता चौधरी

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा...

आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी- सरिता चौधरी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी,असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सरिता चौधरी यांनी केले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.30) रोजी आढावा बैठक पार पडली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार मॅपिंगच्या कामाला गती मिळाली असून 30 एप्रिल 2026 पर्यंत 32,47,094 मतदारांपैकी 24,16,618 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची एकूण प्रगती 74.42 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.

शहरी भागातील मतदारसंघांमध्ये मॅपिंगचे प्रमाण तुलनेने कमी असून सध्या ते 50 ते 60 टक्क्यांच्या दरम्यान आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 105-फुलंब्री, 107-औरंगाबाद मध्य, 108-औरंगाबाद पश्चिम व 109-औरंगाबाद पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष आढावा बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांना कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. 10 मे 2026 पर्यंत किमान 90 टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या प्रक्रियेत जनजागृती वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार मॅपिंग हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक होण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे स्थलांतरित, मृत किंवा अनुपलब्ध मतदारांची नोंद सुधारता येते, तसेच पात्र नागरिकांची नावे योग्य ठिकाणी समाविष्ट होतात.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरी आल्यास त्यांना आवश्यक माहिती सहकार्याने द्यावी आणि मतदार यादीत आपला तपशील तपासून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी,असे निर्देश श्रीमती चौधरी यांनी

दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow