मनसेच्या मेळाव्यात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी निर्धार, मेळाव्यात महायुतीचे नेते उपस्थित
मनसेच्या मेळाव्यात महायुतीचे नेते, उमेदवार संदीपान भुमरेंची उपस्थिती...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्याचा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावा आयएमए हॉल अदालत रोड येथे पार पडला. या मेळाव्याला मनसे नेते बाळा नांदगावकर, महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे, शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे आणि मनसेचे जिल्हातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील झाली आहे त्यानुसार सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जोरदार तयारी करतील असे आश्वासन बाळा नांदगावकर यांनी दिले.
महायुतीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद निश्चितच मोठी आहे आणि मी राज साहेबांचे पाठिंब्यासाठी मनापासून आभार मानतो, लवकरच महायुतीचा एकत्रित मेळावा घेतला जाईल असे पालकमंत्री श्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
शिवसेनेचे प्रवक्ते श्री संजय शिरसाठ यांनी पाठिंबासाठी राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानले, आम्ही सर्व स्वर्गीय बाळासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील अत्यंत निष्ठावंत आहेत त्यामुळे त्यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन करतो. महायुतीमध्ये सर्व मनसे कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असेही श्री.संजय शिरसाट म्हणालेत, राज साहेबांची सभा शहरात व्हावी यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करणार आहोत असेही श्री संजय शिरसाठ म्हणालेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी देखील यावेळी भाषण केले. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची जबरदस्त पकड असून जिल्ह्यात शाखेचे नेटवर्क आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल असेही श्री दिलीप बापू धोत्रे म्हणालेत.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री सुमित खांबेकर यांनी देखील भाषण केले. शहरातून एमआयएमचा झेंडा उखडून टाकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करेल. शहराच्या नामांतराच्या वेळी एमआयएमला विरोध करणारे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते. याची आठवण देखील श्री सुमित खांबेकर यांनी करून दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात पाण्यासाठी, रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली आहेत त्यामुळे मनसेचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो असेही श्री खांबेकर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बिपिन नाईक यांनी केले, सूत्रसंचलन श्री.वैभव मिटकर यांनी केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री सतनामसिंग गुलाटी,श्री दिलीप चितलांगे, श्री दिलीप बनकर, शहराध्यक्ष गजन गौडा पाटील, शहराध्यक्ष आशिष सुरडकर, जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार, श्री प्रशांत जोशी, श्री.संकेत शेटे,श्री.राहुल पाटील उपस्थित होते.
तसेच विद्यार्थी सेना, महिला सेना, जनहित कक्ष, वीज कक्ष, वकील सेना यांचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय देशपांडे, अशोक पवार प्रतीक गायकवाड पाटील, विकी जाधव ,अजय काकडा, मकरंद कुलकर्णी,, मोनू तुसे, रामकृष्ण मोरे ,डॉ.संकेत देशमुख, सतीश सोळुंके, अक्षय हिवाळे पाटील, प्रशांत आटोळे, अक्षय सोनवणे, अण्णा मगरे ,अभय मांजरमकर ,अमित ठाकूर, अमित जयस्वाल, अविनाश पोफळे, आकाश खोतकर, किरण जोगदंड, गणेश सोळुंके ,सतीश नवपुते ,चंदू नवपुते, चिन्मय बक्षी,जॉन बोरगे, प्रशांत दहिवाडकर, मंगेश दामोदर ,मंदार देसाई, मनीष जोगदंड, मनोज भिंगारे, विक्रम सिंग परदेसी, विशाल बैद, विशाल भोंगाने, शशीन देशपांडे, शिवम बोराडे शुभम गंगारे, शेखर रणखांब पाटील, शेख शौकत, संतोष पवार, संदीप आरखं, सनी ,सागर राजपूत, सुरें
द्र वाडेकर आदी..
What's Your Reaction?