मराठवाड्याचे प्रश्न विधिमंडळात आक्रमकपणे मांडणारे सतीश चव्हाण यांना विजयी करा - डॉ.गफ्फार कादरी

 0
मराठवाड्याचे प्रश्न विधिमंडळात आक्रमकपणे मांडणारे सतीश चव्हाण यांना विजयी करा - डॉ.गफ्फार कादरी

मराठवाड्याचे प्रश्न विधिमंडळात आक्रमकपणे मांडणारे सतीश चव्हाण यांना विजयी करा-- डॉ. गफ्फार कादरी

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी डॉ. गफ्फार कादरी यांच्या विविध ठिकाणी भेटी गाठी. बीड, दि.18(डि-24 न्यूज)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाड्यातील विविध प्रश्न आक्रमकपणे सभागृहात मांडून ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजय करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.गप्फार कादरी यांनी केले.

आज बीड शहरात महायुतीचे उमेदवार चव्हाण सतीश भानुदासराव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गप्फार कादरी यांनी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा सिटीझनचे संपादक शेख मुजीब, उपसंपादक चंदन पठाण, अँड खाजा बॉस, शेख जुलफेकर, अल्पसंख्यांक समाजातील संस्थाचालक तथा नगरपालिकेचे सभापती शेख निजाम सरकार, राष्ट्रवादीचे भागवत तावरे,शिवसेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, सचिन मुळूक, उर्दू तामिरचे संपादक काझी मकदुम, जमीयत उलेमा चे मराठवाडा उपाध्यक्ष मुज्तबा खान, लोकहित शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष फेरोज खान, गुलाम नबी उर्दू शाळेचे अध्यक्ष शेख नदीम,प्रा. शेख सोहेल, अब्दुल अजिज बागवान शाळेचे सचिव जावेद बागवान, मिलिया कॉलेज चे प्राचार्य मो.इलियास फाजील,मुख्याध्यापक इरफान सिद्दीकी, प्रा.जावेद पाशा , आलहुदा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सिराज खान आरजू यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक व पदवीधरांच्या भेटी घेतल्या.

याप्रसंगी बोलताना डॉ.गप्फार कादरी म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार सतीश चव्हाण ही निवडणूक लढवत आहेत. मागील तीन टर्म पासून आमदार सतीश चव्हाण पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. या काळात त्यांनी शिक्षक, प्राध्यापक, पदवीधर त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील प्रश्न प्राधान्याने विधिमंडळात मांडून ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ते नेहमीच शासनस्तरावर पाठपुरावा करत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला आमदार सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीचे मतदान करून आपण त्यांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन डॉ.गप्फार कादरी यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow