मराठा आरक्षण, दुपारी मंत्री मंडळ उपसमीतीची बैठक, राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा परिणाम...
मराठा आरक्षणा बाबत मंत्री मंडळ उपसमितीची महत्वाची बैठक आज होणार
राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा परिणाम...!
मुंबई (प्रतिनिधी )मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत
करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चा टीम मुंबई सातत्याने केल्या गेलेल्या मागणी प्रमाणे जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी दि ०९ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या प्रदीर्घ अन्न त्याग उपोषण आंदोलना मुळे विविध विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच जी आर मध्ये योग्य त्या दुरुस्ती करून घेण्या साठी मराठा क्रांती मोर्चा टीम मुंबई ने सातत्याने पाठपुरावा केला.
त्या अनुसार मुंबई टिम ला सुद्धा बैठकी साठी निमंत्रित केले गेले आहे.
ही बैठक बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ०२:०० वाजता, सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा होणार आहे:
१. मराठा आरक्षण कायदा, २०२४ बाबत न्यायालयीन प्रकरणांचा आढावा.
२. शासन निर्णय दि. २ सप्टेंबर २०२५ (हैदराबाद गॅझेटियर) बाबत न्यायालयीन प्रकरणांचा आढावा.
३. मराठा समाजासाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा.
४. सारथी संस्थेमार्फत सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती.
५. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा आणि इतर महत्वाच्या विषयावरआपल्या हक्काचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्या साठी व सोडवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करु.
शासनाबरोबर मीटिंगसाठी आम्ही दोन महिने प्रयत्न करत होतो..
सदर मिटींगला सन्माननीय जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे सह मराठा क्रांती मोर्चा टीम मुंबईचे रामचंद्र शेडगे, अनिल सुर्वे, बाळासाहेब इंगळे, राजन घाग, रुपेश मांजरेकर,सदाशिव बानुगडे , संतोष शेजवळ, मारुती देसाई, राकेश वासुदेव, पांडुरंग रोडे, सुभाष देसाई, दिनेश पवार, शैलेश शिंदे सुशील निकम, विवेक शिंदे, सूर्याजी सोनूवले, सुभाष पाटील,अंतोष कांबळे,रवींद्र शिंदे संतोष दळवी व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत.
What's Your Reaction?