मराठा आरक्षण सुनावणी... आयोगाने मांडलेल्या आकडेवारीवर याचिकाकर्त्याचा आक्षेप...

 0
मराठा आरक्षण सुनावणी... आयोगाने मांडलेल्या आकडेवारीवर याचिकाकर्त्याचा आक्षेप...

मराठा आरक्षण सुनावणी...

आयोगाने मांडलेल्या आकडेवारीवर याचिका कर्त्यांचा आक्षेप...

पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला...

मुंबई, दि.5(डि-24 न्यूज)- -मराठा आरक्षणा बाबत 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये जेष्ठ वकील प्रदीप संचेती यानी नमूद आकडेवारी स्वयं घोषीत असल्याचा व आयोगाने मांडलेल्या आकडेवारीवर याचिका कर्त्यांचा आक्षेप नोंदवत 

ज्याना आरक्षण द्यायचे आहे त्यांना विचारुन तयार केल्याचा आक्षेप घेत राम सिंह निकालातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा आधार घेत आक्षेप घेतला. 117 पैकी 90 गुण हे राज्य सरासरीच्या निकषाचे पालन न करता दिलेले आहेत असा आक्षेप वकील संचेती यानी घेतला आहे.

5 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सलग अथवा आठवड्यातील तीन दिवस सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या मागणीला महाधिवक्ता यानी आक्षेप घेतला होता.

आयोगाने मांडलेल्या आकडेवारीला आक्षेप घेताना वकील प्रदीप संचेती यानी मराठा समाज इतका मागासलेला असेल तर आरक्षणातील अन्य समुहांची तपासणी करून प्रगत समुहांना वगळावे लागेल असा महत्वाचा युक्तिवाद न्यायलयाच्या समोर मांडला आहे जो सरकारने मराठा आरक्षण कायद्यातील कलम 4 (4) नुसार दिलेल्या बेकायदा संरक्षणावर बोट ठेवणारा आहे. हे केलेले सर्वेक्षण हे मराठा समाजाला मागास ठरवण्या फ्रॉड पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले.

यामुळे ज्या डेटा आधारे मागासपणा सिद्ध होत नाही तिथे अपवादात्मक परिस्तिथी दाखवून आरक्षण देणे हे विविध न्याय निवड्या नुसार चुकीचे आहे अशी भूमिका मांडली.

16 टक्के प्रतिनिधित्व 9 टक्के कसे झाले ? हे सिद्ध करण्याची त्यानी मागणी केली आहे. शासकीय सेवेतील प्रतिनिधित्वाची आकडेवारी मांडत आक्षेप घेतला. समरी मधील आकडेवारी 16% असताना 9% आकडेवारी कशी आली असा देखील त्यानी आक्षेप नोंदवला.

या झालेल्या सुनावणीला अनवानी असलेले मराठा समाजाच्या वतीने असलेले मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ता व जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील हे एकमेव उपस्थित होते. त्यांचे सोबत मुंबई टीमचे रामचंद्र शेडगे, 

प्रफुल्ल पवार यांचे सह प्राचार्य तांबे शासनाचे वकील मिलिंद साठे, जेष्ठ वकील विजयसिंह थोरात व इतर वकिला सह मराठा आरक्षण कक्षाचे व मागास आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढील सुनावणी ही 27 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow