महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात, 14 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार...

 0
महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात, 14 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार...

महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात, 14 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकांचा बिगुल वाजला. आता राज्याचे लक्ष लागलेल्या 29 महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेचाही समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसुचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभूच्या मतदार यादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरीता प्रसिद्ध करण्याचा दिनांक 14/11/2025, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना करण्याचा अंतिम दिनांक 22/11/2025, प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याचा दिनांक 6/12/2025, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे दिनांक 12/12/2025 करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow