महाराष्ट्रात विज कर्मचाऱ्यांचा संप सुरू तरीही विजपुरवठा सुरळीत...!

 0
महाराष्ट्रात विज कर्मचाऱ्यांचा संप सुरू तरीही विजपुरवठा सुरळीत...!

महाराष्ट्रात विज कर्मचाऱ्यांचा संप सुरू तरीही विजपुरवठा सुरळीत...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- 9 ऑक्टोबर पासून राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समीतीत सात संघटनांनी संप पुकारला आहे. याचा परिणाम विज वितरणात दिसून येत नाही. विजपुरवठा सुरळीत सुरू आहे. हा संप बेकायदेशीर असल्याचे बोलले जात आहे.

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील विविध मार्गांने होणा-या खासगीकरणाला विरोध. महानिर्मितीच्या ताब्यातील जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण, महापारेषण मधील TBCB च्या माध्यमातून खाजगीकरण, महावितरण मधील 329 उपकेंद्राचे खाजगीकरण, समांतर विज परवाना विरोध. महावितरणच्या समांतर पुनर्रचनेला विरोध. राज शासनाने सुरू केलेली पेन्शन योजना सुरू करा. मागासवर्गीयांना पुर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करा. तिन्ही कंपनीतील वर्ग 3 ते 4 स्तरावरील संवर्ग निहाय रिक्त पदे सरळसेवा भरती, पदोन्नती, अंतर्गत भरती द्वारे जि.आर.प्रमाणे भरणे. कंत्राटी व बाह्य स्त्रोत कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याबाबत धोरण राबवावे या मागणीसाठी हा तीन दिवसाचा संप सुरू आहे.

विज कर्मचाऱ्यांच्या 29 पैकी 7 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. या संपात महावितरणमधील 62 टक्के अभियंते, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नाही. वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भुमिका महावितरण व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीत स्पष्ट केली आहे. त्यांचे लेखी इतिवृत्त संयुक्त कृती समितीला दिले आहे तरीही 9 ऑक्टोबर पासून 72 तासांच्या बेकायदेशीर संपाला सुरुवात करण्यात आली आहे. वीज हि अत्यावश्यक सेवा आहे नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिरक्षक अधिनियम म्हणजे मेस्मा लागू करण्यात आला आहे. म्हणून हा संप बेकायदेशीर असल्याचे महाविरण कडून स्पष्ट केले आहे. संपामुळे पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. संपात सहभागी नसणारे कर्मचारी, 20 हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सुचिवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र याठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.

वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असतील तर नागरीकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow