महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ, व सिनेट निवडणुकीत अभाविपचा दबदबा, 9 जागांवर विजय
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा 9 पैकी 9 जागांवर विजय
विद्यार्थ्यांच्या विश्वासाला मिळाला पुन्हा एकदा कौल; तिसऱ्यांदा अभाविपने रचला इतिहास
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) छात्रसंघ आणि सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 9 पैकी 9 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा इतिहास रचला आहे. हा विजय केवळ निवडणुकीतील आकडा नसून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने त्यांच्या सोबत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे. शैक्षणिक अडचणी असोत, विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न असोत किंवा त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची गरज असो, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. त्याच कामाची आणि सातत्यपूर्ण संवादाची पोचपावती या निवडणुकीच्या निकालातून मिळाली आहे अशी माहिती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या निवडणुकीत सिनेटसाठी लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे (BHMS), आदित्य रामकिसन जायभाय (BDS) आणि शुभांकर नितीन मनगटे (MBBS) विजयी झाले आहेत. तसेच छात्रसंघाच्या अध्यक्षपदी रोहित मधुकर माळी (BPTH), उपाध्यक्षपदी यशराज धनंजय काकड (BPTH) आणि मिथिलेश श्रीकृष्ण माहोरे (BAMS), सचिवपदी ज्ञानेश्वर रावसाहेब आंधळे (BHMS), तर सहसचिवपदी केशव शरद पाटील (BSc Nursing) आणि देवांशी प्रशांत भुराणे (BDS) यांनी विजय मिळवला आहे.
अभाविपचे प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नान नन्नवरे म्हणाले, “अनेक अडचणी आणि अभाविपविरोधात उभ्या करण्यात आलेल्या चुकीच्या नॅरेटिव्हनंतरही Gen Z ने पुन्हा एकदा अभाविपचीच निवड केली आहे. आजचा युवा जागरूक आहे, तो स्वतः सत्य पडताळतो आणि कामाच्या आधारावर निर्णय घेतो. ९ पैकी ९ जागांवरील हा विजय म्हणजे विद्यार्थ्यांनी अभाविपच्या कामावर आणि विचारांवर पुन्हा एकदा व्यक्त केलेला ठाम विश्वास आहे.”
आजच्या निकालाने विद्यार्थ्यांनी अभाविपला पुन्हा एकदा निवडून देत आपला विश्वास अधिक दृढ केला आहे. सलग तिसऱ्यांदा 9 पैकी 9 जागांवर विजय मिळणे ही अभाविपच्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे; मात्र त्याचवेळी ही मोठी जबाबदारीदेखील आहे. छात्रसंघ अध्यक्ष श्री.रोहित माळी म्हणाले,”विद्यार्थ्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो केवळ विजयापुरता मर्यादित न राहता आगामी काळातील कामातून सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला संवेदनशीलतेने हाताळत, त्यांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक हितासाठी अधिक ताकदीने काम करण्याचा संकल्प या विजयाच्या निमित्ताने अभाविप करते.”
या विजयासाठी सर्व विजयी उमेदवारांचे तसेच निवडणूक प्रक्रियेत अथक परिश्रम घेणाऱ्या अभाविपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अभाविपवर व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांनी दिलेली ही जबाबदारी अधिक संवेदनशीलतेने स्वीकारत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा प्रयत्न आगामी काळातही सुरू राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, नवनिर्वाचित छात्रसंघ अध्यक्ष श्री.रोहित माळी, सीनेट सदस्य आदित्य जायभाय व शुभंकर मनगटे उ
पस्थित होते.
What's Your Reaction?