आमदार संजय केनेकर यांच्या प्रयत्नामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या मार्गी

आमदार संजय केनेकर यांच्या प्रयत्नामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी...
आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे बैठकीत आदेश
मुंबई, दि.15(डि-24 न्यूज) – सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींबाबत विधान परिषद आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण विषयावर यशस्वी चर्चा पार पडली.
या बैठकीत नियमित पदोन्नती कर्मचारी प्रतिनिधींनी वेतनत्रुटी, पद निश्चिती (सेवा स्थैर्य) रिक्त पदांची भरती, बायोमॅट्रिक, जिल्हा परिषद हस्तातारण यांसंदर्भातील अडचणी मांडल्या.
आरोग्य राज्यमंत्री यांनी जिल्हापरिषद हस्तांतरणाबाबत स्थगिती देणेबाबत संबंधित विभागप्रमुखांना आदेशित केलेले असुन इतिवृत्तांमध्ये तात्काळ नोंद घेवुन आदेश निर्गमित करणेबाबत सुचित केले.
हिवताप विभागाच्या आकृतीबंध मंजूर करणे बाबत.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक पदे तात्काळ भरावी.
आंतरमंडळ बदली प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे.
आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाची पदोन्नती करणेबाबत.
नागपूर विभागातील 54 क्षेत्रीय कर्मचारी यांच्या पदोन्नती पस्थापने बाबत.
बदली करताना समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविणे बाबत...
मंत्री महोदयांनी या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत सकारात्मक प्रतिसाद दिला. या सोबतच आयुक्त, सार्वजनिक आरोग्य, श्री. अमगोथू श्री रंगा नायक(भा. प्र. से. )
आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य, अतिरिक्त संचालक डॉ. विजय कंदेवाड, अवर सचिव श्री अनिल कुमारिया, सह संचालक डॉ. कमलापूरकर मॅडम उपस्थित होते. विविध स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्री विजय मोहरकर, उपाध्यक्ष श्री. काकासाहेब शेळके पाटील, श्री बाळासाहेब घुगे, विविध पदाधिकारी श्री संजय राव, यादवराव बोराडे, रमेश देशमुख, राज्य महासंघ समन्वयक श्री.अनिल खराडे, कोल्हापूर विभागिय कार्याध्यक्ष श्री.इकबाल जमादार, सांगली जिल्हा अध्यक्ष श्री.भूषण हिरेमठ उपाध्यक्ष श्री. महादेव गंबरे, सरचिटणिस श्री. राहुल बकरे, अजित चव्हाण, महेश शिंदे व जिल्ह्यांतील कर्मचारी प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राज्यधक्ष व इतर प्रतिनिधिनी आपापल्या विभागातील समस्यांचे मुद्देसूद सादरीकरण केले.
या चर्चेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातील कार्यवाहीबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री महोदयांनी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष दिले व आवश्यक त्या सकारात्मक उपाययोजनांची हमी दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.
What's Your Reaction?






