महाविकास आघाडीच्या वतीने क्रांतीचौकात जोरदार जोडे मारो आंदोलन, कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
महाविकासने केले क्रांतीचौकात जोरदार आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाविकास आघाडी व भाजपा पुन्हा आमनेसामने, क्रांतीचौकात जोरदार आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.... म्हणून अनर्थ टळला...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) क्रांतीचौकात महाविकास आघाडीच्या वतीने आज सकाळी जोरदार जोडेमारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते अक्रामक झाले. दुसऱ्या बाजूला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या निषेधार्थ प्रती आंदोलन केल्याने दोन्ही गटात तणाव होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. याप्रसंगी पोलिसांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कार्यवाही करुन सोडले.
यावेळी शिवसेना(उबाठा) गटाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, महानगरप्रमुख राजू वैद्य, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नामदेव पवार, राम बाहेती , एड अभय टाकसाळ, अरुण सिरसाठ, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, महीला आघाडीच्या आशाताई दातार, भागूअक्का सिरसाठ, सरोज मसलगे, मेराज पटेल, छायाताई जंगले, दिपाली मिसाळ, दिक्षा पवार, युवासेना अध्यक्ष हनुमान शिंदे, मुन्नाभाई, शेख तय्यब आदी उपस्थित होते
.
What's Your Reaction?