माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव पाटील रुजू...

 0
माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव पाटील रुजू...

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10 (डि-24 न्यूज)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी या पदावर श्रीमती संजीवनी जाधव-पाटील नुकत्याच रूजू झाल्या.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने व अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असणाऱ्या श्रीमती जाधव यांनी या पूर्वी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे उपसंपादक, त्यानंतर विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, विभागीय माहिती कार्यालय , कोकण भवन नवी मुंबई येथे सहायक संचालक म्हणून कार्य केले आहे.

    श्रीमती जाधव-पाटील यांनी पत्रकारितेत बी.जे., एम.जे. तसेच एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. प्रशासनात येण्यापूर्वी दै. लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून कार्य केले आहे. तसेच आकाशवाणी केंद्रात प्रादेशिक वृत्तनिवेदिका आणि एमसीएन (माध्यम) वृत्तवाहिनीमध्ये निवेदिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow