मोकाट कुत्र्यांची दहशतीला आवर घालण्याच्या मागणीसाठी केली तीव्र निदर्शने...

 0
मोकाट कुत्र्यांची दहशतीला आवर घालण्याच्या मागणीसाठी केली तीव्र निदर्शने...

मोकाट कुत्र्यांची दहशतीला आवर घालण्याच्या मागणीसाठी केली तीव्र निदर्शने...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- अलीकडच्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशतीला शहरवासी त्रस्त झाले आहेत. शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. काही गंभीर घटनांमुळे लहान निष्पाप मुलांवर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना प्राण गमवावे लागले. जाफर गेट परिसरात नुकतीच घडलेल्या एका दुर्देवी घटनेत अरमानला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आज मनपा समोर झालेल्या युथ मोव्हमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वतीने तीव्र निदर्शने करुन करण्यात आली. 

मनपाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संपूर्ण शहरात आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने मोहिम राबवावी. नागरीकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने योग्य ती यंत्रणा तयार करावी. कुत्र्यांच्या लसीकरण, आश्रय व नियंत्रण यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा. जाफर गेट परिसरातील मृत बालकाच्या कुटुंबाला शासनाने तातडीने दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी स्थायी पध्दतीने यावर नियंत्रणाचे धोरण तयार करावे. इतर राज्यांप्रमाणे कुत्र्यांच्या चाव्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा. ज्यामध्ये प्रत्येक दाताच्या चालण्यासाठी दहा हजार रुपये, खोल जखम झाल्यास अतिरिक्त 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जावी. या मागण्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याप्रसंगी महीला व बालकांनी सहभाग घेतला.

या आंदोलनात मुसद्दीक अहेमद, सलमान सिद्दीकी, मुश्ताक खान, सय्यद तन्वीर शाह, फहाद रशीद खान , मोहम्मद शोएब शेख, जाहिद शुलारान, सालेह आमेर, फैसल अमान खान, शरजील खान, उमर सिद्दीकी, अल्तमश हाश्मी, अब्दुल मुकीद, मुजाहिद अब्दुल्ला, मसरुर खान, मोहसीन खान, जावेद कुरेशी, मतीन पटेल, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, जमात ए इस्लामी हिंद महीला विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow