योगी आदीत्यनाथ यांनी राजीनामा द्यावा... काँग्रेसची मागणी

 0
योगी आदीत्यनाथ यांनी राजीनामा द्यावा... काँग्रेसची मागणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी....!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) उत्तर प्रदेश अयोध्या येथे 22 बावीस वर्षीय दलित महिला वर अत्याचार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाला बेपत्ता ची तक्रार देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने महिलेला शोधण्याची गंभीरता दाखवली नाही. आयोध्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर महिलेचा भावजयने मृतदेह शोधला बावीस वर्षे महिलांच्या अंगावर इजा होती मृत महिलावर अत्याचार करून तिचे डोळे सुद्धा फोडण्यात आले. शरीराच्या अनेक भागावर जखमा होत्या. उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने एका 22 बावीस वर्षीय दलित महिलेचा मृतदेह तीन दिवस उलटून गेल्यानंतरही शोधण्यामध्ये अपयश आले तर दोषींना कधी शोधून कधी त्यांना शिक्षा होईल असा संभ्रम आहे. म्हणून देशाचे राष्ट्रपती यांनी तात्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यावा असे आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. कारण उत्तर प्रदेश मध्ये नेहमी दलित अल्पसंख्यांक महिला गोरगरीब जनतेवर यांच्यावर वारंवार अन्याय होण्याची घटना वाढत चाललेली आहे. यामध्ये शासन आणि प्रशासनचा समाजकंटक गुंडांवर काही धाक उरलेला नाही असे अनेक घटनांमध्ये दिसून आलेले आहे. याकरिता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी राजीनामा द्यावा व दोषिंना कडक शिक्षा द्यावी असे पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांना आपल्या तीव्र भूमिका मांडल्या व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. आयोध्यामध्ये घडलेल्या या घटनेचा फास्टट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होऊन दोषींवर फाशीवर लटकवण्याची कारवाई उत्तर प्रदेश सरकारने करावी. असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, भिमशक्ती महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दिनकर ओंकार दादा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय सचिव जयप्रकाश नारनवरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आकेफ रझवी, अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. मंजुताई लोखंडे, काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष चंद्रप्रभाताई खंदारे, संतोष दिडवाले, किरण पाटील शेखावत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शोएब अब्दुल्ला, आमेर रफिक खान, प्राध्यापक शीलवंत गोपनारायण, रफिक खान, शिरीष चव्हाण, रवी लोखंडे, आनंद दाभाडे, मजाज खान, आजहर शेख, ऐतेशाम खान, डॉ. गौतम शिरसाट, पी. बी. खोतकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow