रोशन गेट , किराडपुरा ते आझाद चौक रस्त्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त...
रोशन गेट किराडपुरा ते आजाद चौक रस्त्यावरिल अतिक्रमणे जमीनदोस्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) -महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत रोशन गेट शरीफ कॉलनी किराडपुरा राम मंदिर रोड परिसर व पुढे आझाद चौक पर्यंत अतिक्रमण हटाव पथका ने आज एकूण 32 अतिक्रमण धारका विरुद्ध कारवाई करण्यात आली.
दि.26 मार्च रोजी राम नवमी आहे त्या अनुषंगाने किराडपुरा येथील राम मंदिर परिसरात रामजन्म कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्या दिवशी व नंतरही भाविकांना येण्या जाण्यासाठी अडचण होऊ नये वाहतुकीला अडथळा होऊ नये लहान-मोठे अपघात घडू नये व यामुळे कोणाचेही आपसात भांडण होऊ नये या सर्व बाबतची खबरदारी घेऊन आज महानगरपालिकेने वरील भागात एकूण 32 अतिक्रमण धारका विरुद्ध जेसीबीच्या साह्याने कारवाई केली.
यामध्ये रोशन गेट शरीफ कॉलनी किराड पुरा राम मंदिर परिसर पर्यंत नागरिकांनी मोठे शेड उभारून त्यावर दुकाने थाटली होती प्रथम त्यांना साहित्य व काढण्यासाठी वेळ देऊन सूचना दिल्या ज्यांनी प्रशासनाला सहकार्य केले नाही अशा दुकानदार अशा व्यापाराविरुद्ध जेसीबीच्या साह्याने कारवाई करून बांधकामे तीन पत्राचे शेड व भाजी व नान खलिया बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भट्ट्या निष्काशीत करण्यात आल्या.
रहमान्या कॉलनी आजाद चौक पर्यंत रस्त्यावर बांधकाम साहित्य वाळू सिमेंट कच आणि विटा रस्त्यावर ठेवून वाहतुकीला अडथळा करणारे साहित्य पडलेले होते त्यांच्याविरुद्ध माजी सैनिक यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय दहा चार चाकी बेवारस वाहने टोइंग द्वारे उचलून गरवारे क्रीडा संकुल गरवारे मैदानावर जमा करण्यात आले. राम मंदिर परिसरातील वाणिज्य वापरासाठी तयार करण्यात आलेल्या दुकानदाराविरुद्ध दोन्ही बाजूने मोठमोठे ओटे काढण्यात आले व समोरचे बाजू पूर्ण क्लिअर करण्यात आली. तसेच चार रिक्षा धारकांनी आपल्या रिक्षा सोडून जाय मोक्यावर उपस्थित नसल्याने दोन तास झाले तरी येत नव्हते म्हणून त्यांच्याविरुद्ध पाच पाचशे रुपये दंड लावून कारवाई करण्यात आली. उघड्यावर दोन लोक चिकनची मास विक्री करत होते त्यांचे दहा बाय दहाची शेड निष्काषित करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले व त्याबाबतचा अहवाल प्राणीशास्त्र संग्रहालय विभागाला देण्यात आला. आज दिवसभरात एकूण लहान मोठे शेड लोखंडी टपरी यांच्यासह इतरही अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली सदर कारवाई आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा पोलीस निरीक्षक बुधवंत , उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त शेख रफिक, संजय सुरडकर ,सय्यद जमशेद रवींद्र देसाई जिंसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कर्मचारी आगळे, परदेशी ,हनीफ व डीबी पथकातील फिरोज शेख , कुठून या पोलीस कर्मचारी यांनी कारवाई सहभाग घेतला. यावेळी
नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?