वक्फ बोर्डाच्या बैठकीत एमआयएमचा राडा, स्मार्ट सिटी कार्यालयात वक्फचे कार्यालय हलवण्याचे आश्वासन...!

 0
वक्फ बोर्डाच्या बैठकीत एमआयएमचा राडा, स्मार्ट सिटी कार्यालयात वक्फचे कार्यालय हलवण्याचे आश्वासन...!

वक्फ बोर्डाच्या बैठकीत एमआयएमचा राडा, स्मार्ट सिटी कार्यालयात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - वक्फ बोर्डाने किले अर्क येथील हज हाऊसमध्ये 15 खोल्यांत कार्यालय थाटल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयएमचे विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक वक्फ बोर्डाच्या बैठकीत धडकले व राडा केला. येथे वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही. जे साहित्य हज हाऊसमध्ये आणले ते आत्ताच पर घेवून जा असा पवित्रा एमआयएमच्या नगरसेवकांनी घेतला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वक्फ बोर्डाचे सदस्य एड इफ्तेखार हाश्मी यांनी बैठकीत शिष्टमंडळाला घेवून गेले व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांची भेट घालून दिली. याप्रसंगी विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर व उपस्थित नगरसेवकांची चर्चा झाली. हज हाऊस हे मोठे आंदोलन उभे झाल्यानंतर उभारण्यात आले आहे. जो उद्देश हज हाऊस पवित्र हज यात्रेकरुंसाठी आहे त्याच उद्देशासाठी या इमारतीचा वापर झाला पाहिजे. या इमारतीत वक्फ ट्रीब्युनल, अल्पसंख्याक आयुक्तालय, मार्टीचे कार्यालय आणि आता वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे तो खपवून घेणार नाही यासाठी मोठे आंदोलन उभे करु असा इशारा एमआयएमने दिला. कार्यालयासाठी जागा हवी असेल तर शहरातील जालना रोडवर वक्फ मालमत्तांवर टोलेजंग इमारती उभ्या आहेत. तसेच स्मार्ट सिटी कार्यालय व छावणी येथील जलजीवन मिशनचे कार्यालय वक्फच्या जागेवर बांधले आहे. या जागेवर कार्यालय स्थलांतरित करावे यासाठी एमआयएम मदत करेल असा इशारा दिला. यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी संतप्त झालेल्या नगरसेवकांना थंड करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालय, जलजीवन मिशनचे कार्यालय अथवा भाडेतत्त्वावर कार्यालयाची जागा घेण्यासाठी मंडळाच्या बैठकीत ठराव घेणार आहे. आपला प्रस्ताव ठराव घेवून शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन मिळाले यानंतर शिष्टमंडळ शांत झाले. हे कार्यालय तात्पूरत्या स्वरुपात आहे कायमस्वरूपी नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक फेरोज खान, मतीन पटेल, उसामा अब्दुल कदीर, काकासाहेब काकडे, शेख सलिम सहारा, समीर कुरेशी, मोहम्मद वसीमोद्दीन, सय्यद साबेर, फेरोज खान, सय्यद अकील सागर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow