विकासाच्या वचनासह महायुतीचे उमेदवार मैदानात, अतुल सावे यांच्या रॅलीने दिला विजयाचा संदेश

 0
विकासाच्या वचनासह महायुतीचे उमेदवार मैदानात, अतुल सावे यांच्या रॅलीने दिला विजयाचा संदेश

विकासाच्या वचनासह महायुतीचा उमेदवार मैदानात; अतुल सावे यांच्या रॅलीने दिला विजयाचा संदेश

छत्रपती संभाजीनगर(डि-24 न्यूज), दि.28(डि-24 न्यूज )विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार श्री. अतुल मोरेश्वर सावे यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करत आपल्या उमेदवारी अर्जा दाखल केला. भारतीय जनता पक्षासह शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), व इतर घटक पक्षांच्या समर्थनासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जनसमुदाय श्री सावे यांच्या या भव्य रॅलीत उत्साहाने सहभागी झाला होता.

श्री सावे यांच्या नेतृत्वाखालील या वाहन रॅलीने मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष वेधले. रॅलीची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. यानंतर, महायुतीचा जयघोष करीत अतुल सावे यांच्या नेतृत्वात रॅली पुढे सरकली. पुंडलिक नगर चौक, जय भवानी नगर चौक, वसंतराव नाईक चौक, कॅनॉट मार्गे चिस्तीया चौक, अविष्कार चौक, बजरंग चौक, ओंकार गॅस चौक, एन 8 आजाद चौक, सेंट्रल नाका, सेव्हन हिल, मोंढा नाका, जाफर गेट, आणि शेवटी श्री संस्थान गणपती मंदिर येथे आरती करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी, श्री. अतुल सावे यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. “मी दोन वेळेस हिंदू आमदार म्हणून मतदारांनी मला निवडून दिले आहे. शहरातील रस्त्यांची पूर्वीची परिस्थिती अत्यंत दयनीय होती, मात्र या समस्येवर काम केले आणि आज मतदारसंघातील रस्ते सुधारलेले आहेत. यंदा माझी निवडणूक एमआयएम विरुद्ध असून, त्यांना पुन्हा पराभूत करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीने उतरले आहोत,” असे त्यांनी सांगितले.

सावे यांनी एमआयएमवर जोरदार टीका करत त्यांच्या पक्षाच्या कमकुवत संघटना असल्याचे म्हटले. “एमआयएमला निवडणुकीसाठी एकाच उमेदवाराला वारंवार निवडावे लागते, कारण त्यांच्याकडे संघटनेची बांधणी नाही. मात्र, माझ्या पाठीशी हिंदू मतदार बांधव खंबीरपणे उभे आहेत,” असे सावे म्हणाले.

निवडणुकीच्या या अर्ज दाखल प्रक्रियेत, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. रॅलीदरम्यान महायुतीच्या विविध घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हे शक्तिप्रदर्शन म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारावरील विश्वास असल्याचे जाणवले.

त्यानंतर, श्री. अतुल सावे यांनी एसएफएस शाळेत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिरीष बोराळकर, अभिजीत देशमुख, गजानन मनगटे, नागेश भालेराव,किरण पाटील, किशोर शितोळे, अनिल मकरीये, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, दामू अण्णा शिंदे, प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, शालिनी बुंधे, आकाश राऊत यांच्या सह मोठ्या प्रमाणावर महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची

उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow