शहरातील 115 नवनिर्वाचित नगरसेवकांचा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते केला सत्कार...

 0
शहरातील 115 नवनिर्वाचित नगरसेवकांचा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते केला सत्कार...

शहरातील 115 नगरसेवकांचा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सत्कार...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - शहरातील सर्व पक्षीय 115 नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज सकाळी अमनउल्लाह मोतीवाला फाऊंडेशनच्या वतीने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन भानुदास सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर समाजसेवक तथा वकील जुबेर अमनउल्लाह मोतीवाला यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक हे देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रामाणिकपणा, जनतेची सेवा व प्रशासनाच्या माध्यमातून विकासाभिमुक प्रयत्न करावे. ईश्वराला साक्ष ठेवून प्रत्येक काम करावे तरच स्वर्गात जागा मिळेल. मुस्लिम समाजाच्या शिकवणीनुसार जन्नतूल फिरदौस असे म्हणतात. जनसेवेसाठी नवनिर्वाचित नगरसेवकांना संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करण्यासाठी जनसेवेसाठी समर्पणाचा स्वभाव असला पाहिजे. जनसेवा करताना स्वार्थाची भावना ठेवू नका. सर्व जाती धर्माचा आदर करावा. मतभेद व जातीय भेद आपल्या जीवनात न आणता राष्ट्राच्या विकासासाठी समर्पणाची तयारी ठेवावी. जनभावना लक्षात ठेवा. लोकांचे आदर करा. भारत देश प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या 2047 पर्यंत आपला देश विश्व गुरु झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी देशातील प्रत्येक नागरीक व लोकप्रतिनिधी यांचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन हरिभाऊ बागडे यांनी केले.

अॅड जुबेर मोतीवाला यांनी आपल्या भाषणात शहरातील सर्व पक्षीय नगरसेवक सर्वांगिण विकासासाठी व नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. तर शहरातील मुख्य रस्ते मोकळे झाले पाहिजे. पार्कींगची समस्या मोठी आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो लवकर सुटला पाहिजे. शहरात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढत आहे. शहराचा झपाट्याने होत असलेल्या विकासात पायाभूत सुविधा वाढत असल्याने गुंतवणूक वाढत असून यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवक शहराच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवीन महापौर कोणत्याही पक्षाचा झाला तरी विकासाला प्राधान्य देईल असे शहरातील जनतेला वाटते असे मत त्यांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow