शास्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी डाॅ.राजेंद्र दाते पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू...!
शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजेंद्र दाते पाटील यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु... !
छत्रपती संभाजीनगर , दि.11(डि-24 न्यूज)- शाश्वत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने रविवारी (दि. 9) पोलिसांची परवानगी नसतानाही क्रांती चौकात उपोषण जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी सुरू केले.
मराठा समाजाच्या हिता साठी उपोषण सुरूच ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तालया समोर अन्न त्याग उपोषण सुरू केले. शाश्वत आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे उपोषण आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान सकाळी दहापासूनच क्रांती चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सव्वा अकराच्या सुमारास जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे अन्न त्याग आंदोलन उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते प्रा. ऋषिकेश कांबळे, अँड. सय्यद अक्रम, राजेश मुंढे प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर, शैलेश भिसे, अमित जाधव, संदीप काळे, पंडितराव बोर्डे, काकासाहेब मोटे ऋषिकेश महाजन, सलीम खामगावकर वसीम सिद्धिकी बाबासाहेब झगरे, सचिन चौधरी, ज्ञानेश्वर गायकवाड, सुरेश मिर्धे यांच्यासह अनेक मान्यवर आणि आंदोलक पुढे आलेआहे.
गॅझेटिअरबाबत भूमिका स्पष्ट करा...
हैद्राबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा-कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. एसईबीसी प्रवर्गाला ओबीसी प्रमाणे शिक्षण,नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आंदोलना दरम्यान दाखल गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला पाच हजार कोटी, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटींचा निधी द्यावा जेणे करून तात्काळ 1500 कोटींचा व्याज परतावा करणे सोयीस्कर होणार असुन पुढील प्रकरणे मंजुरी करणे सुरु करणे सोपे जाणार आहे. या मंडळाचे कार्यकारी संचालक आकार्यक्षम असुन त्यांचे अडमुठे धोरणा मुळे कर्ज प्रकरणे थांबली आहेत म्हणुन त्यांची तात्काळ उचलबांगडी करावी.
प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात आणि कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, या मागण्याही करण्या
त आल्या.
What's Your Reaction?