शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणात पोउपनि नागरगोजे निलंबित व अटक...!

 0
शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणात पोउपनि नागरगोजे निलंबित व अटक...!

शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणात पोउपनि नागरगोजे, अंमलदार बनगे निलंबित...! नागरगोजे यांना अटक...

खुलताबाद, दि.16(डि-24 न्यूज)- पोलीस ठाणे खुलताबाद हद्यीतील वेरुळ येथील श्री सुरेश रुपचंद बोरसे वय 51 वर्षे, व्यवसाय शिक्षक, रा. कौशिक गल्ली यांचे दिनांक 11/06/2026 रोजी मयत झाले असुन त्यांचे मृत्यू बाबत त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता सुरेश बोरसे वय 47 वर्षे रा. कौशिक गल्ली, वेरुळ ता. खुलताबाद यांचे तक्रारीवरुन त्यांचे मृत्यूस कारणीभुत झालेल्या व्यक्ती विरुध्द तक्रार दिल्याने पोलीस ठाणे खुलताबाद येथे कलम 106 (1), 131 बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नमुद घटना अत्यंत गांर्भियाने घेवुन त्याचे सखोल तपास हा स्थानिक गुन्हे शाखा कडुन सुरू आहे. 

पोलीस अधीक्षक यांनी नमुद घटनेच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. प्राथिमक चौकशीमध्ये पो.उप.नि. एकनाथ विश्वनाथ नागरगोजे व पोलीस अंमलदार वाल्मिक बनगे हे दोषी आढल्याने पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे विरुध्द सक्त भुमिका घेवुन त्यांना त्वरित प्रभावाने आज सेवेतुन निलंबित केले आहे.

तसेच नमुद गुन्हयात कुटूंबातील सदस्यांचे जबाब वरुन पो.उप.नि. नागरगोजे यांना आरोपी करण्यात येवुन त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने ताब्यात घेतले आहे. आता आरोपी नागरगोजे हा खुलताबाद पो स्टे येथे LCB पथकाचा ताब्यात आहे . याघटनेच्या अनुषंगाने सखोल तपास करण्यात येवुन कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी कठोर भुमिका पोलीस अधीक्षक यांनी घेतली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow