शिवसेना नेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती, उद्या सकाळी रॅली काढून भव्य सत्कार

 0
शिवसेना नेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती, उद्या सकाळी रॅली काढून भव्य सत्कार

शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भव्य सत्कार...

शिवसेनेच्या वतीने चिकलठाण विमानतळ ते क्रांती चौक काढण्यात येणार रॅली...

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ता. 14 एप्रिल रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोमवार ता. 15 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता करण्यात येणार असून शिवसेना संभाजीनगरच्या वतीने चिकलठाणा विमानतळ ते क्रांती चौक पर्यंत महारॅली काढण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, युवासेना सचिव ऋषिकेश खैरे, सहसचिव धर्मराज दानवे व जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow