शेतक-यांचे विना विलंब, विनाशर्त पिक कर्ज मंजूर करा - अंबादास दानवे
 
                                 
शेतकऱ्यांचे विना विलंब, विनाशर्त पिक कर्ज मंजूर करा...
शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी...
सिबिल आणि थकबाकीमुळे प्रलंबित पीक कर्जाच्या अर्जाबाबत दानवेंनी घेतली बँकांची शाळा घेतली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) : शेतकऱ्यांचे विना विलंब, विनाशर्त पिक कर्ज मंजूर करा अशी मागणी शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सिबिल आणि थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अनेक अर्ज प्रलंबित असल्याने शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांची शाळा हा आंदोलनात्मक उपक्रम संपूर्ण मराठवाडा स्तरावर राबविण्यात आला. या उपक्रम अंतर्गत आज 23 जून रोजी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत शिवसैनिकांसह अंबादास दानवेंनी धडक देऊन पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने बँक अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे आलेले अर्ज किती,पीक कर्ज अर्ज मंजूर किती ?, नामंजूर अर्ज किती?,प्रलंबित अर्ज व त्यांची कारणे काय ?, पीक कर्जाचे उद्दिष्टे किती - आतापर्यंत पूर्ती किती ? आणि सिबिल आणि थकबाकीमुळे किती शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे अर्ज नाकारण्यात आले, याची दानवे यांनी यावेळी माहिती घेतली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना बँकांनी सिबिल बघू नये, असे स्पष्ट आदेश दिलेले आहे. राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना कसलेही सिबिल बघता कामा नये असा स्पष्ट शासकीय आदेश काढलेला असताना बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना सिबिलची अट घालून नाहक त्रास देऊन शेतकऱ्यांना आत्महत्या प्रवृत्त करत असल्याची गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी बँकावर केला.
सद्यस्थितीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्या वतीने पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसे प्रमाणात पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता आहे.
परंतु पिक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर ही राज्य शासनाचे त्वरित कर्ज मंजूर करण्याचे निर्देश असतानाही शेकडो अर्ज आपल्या बँकेत प्रलंबित आहे. सदर अर्ज त्वरित निकाली काढण्याचे आवश्यक असताना हे अर्ज मुख्य शाखा व विभागीय शाखा यांच्याकडे पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. सिबिल व थकबाकी दाखवून अन्य काही तांत्रिक बाबी दाखवून पिक कर्ज नाकारले जात आहे.
या परिस्थितीत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यासाठी बँकांची शाळा हा आंदोलनात्मक कार्यक्रम आम्ही राबवत असून आपण शेतकऱ्यांचे पिक कर्ज त्वरित मंजूर करावे. कोणतेही तांत्रिक कारण दाखवून पिक कर्ज नाकारू नये, अशी मागणी करत आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा गंभीर इशारा शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने दिलेल्या निवेदनात बँकांना दिला.
याप्रसंगी महानगरप्रमुख राजु वैद्य,किसानसेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,संतोष खेंडके, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, राजू इंगळे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे,दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, बापू पवार, संदेश कवडे , प्रकाश कमलानी, कृष्णा मेटे, विनोद सोनवणे, देविदास पवार, बापू कवळे, नितीन पवार, विलास राऊत, मंगेश भाले,माजी माजी नगरसेवक कमलाकर जगताप, सचिन खैरे,आत्माराम पवार,विभागप्रमुख रघुनाथ शिंदे, सचिन कापसे, सोपान बांगर, शाखाप्रमुख शिवकुमार देशमुख, गणेश राऊत, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ विधानसभा संघटक मीरा देशपांडे, अंजना गवई, विजया पवार, मीना खोतकर, रुपाली मुंदडा, अनिता लगड, नंदा काळवणे, मनिषा बिराजदार व युवतीसेना दिपाली पाटील बोरसे उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            