शेवटच्या दिवशी पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी किती नामनिर्देशन पत्रे दाखल वाचा या बातमीत...

 0
शेवटच्या दिवशी पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी किती नामनिर्देशन पत्रे दाखल वाचा या बातमीत...

5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

शेवटच्या दिवशी 51 नामनिर्देशनपत्रे दाखल; आतापर्यंत 92 नामनिर्देशन पत्रे प्राप्त

एकूण 62 उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज): 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक - 2026 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी, दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 51 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली आहेत. कालपर्यंत 41 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. त्यामुळे आज प्राप्त झालेल्या 51 नामनिर्देशनपत्रांची भर पडून निवडणूक कार्यालयाकडे आतापर्यंत एकूण 92 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली आहेत.

या नामनिर्देशनपत्रांद्वारे आतापर्यंत एकूण 62 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यामुळे नामनिर्देशनपत्रांची संख्या 92, तर उमेदवारांची संख्या 62 आहे. 

आज दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये युसुफ खान हनिफ खान, अ. खालेद अ. रशीद, रमेश विनायकराव कसारे, किशोरकुमार प्रकाश शिंदे, विठ्ठल भुजंगराव तळेकर, अण्णासाहेब शेषनाथ साबळे, गजानन रामनाथ उगले, बालाजी सरस्वती रामचंद्र पाटील चाकूरकर, संजीवनी मदनराव टेकाळे, निलम अजय खेमनार, शेख आजम शेख निजाम, रोहित शिवराम बोरकर, मधुकर किसनराव देशमुख, मोहम्मद इसा मोहम्मद यासीन, जनार्धन अंबादास सोरमारे, प्रा. डॉ. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर कोकीकंट, धवलसिंह विनोदराव लावंड, नरसिंह पांडुरंग घोणे, सुदामराव सदाशिवे, अरुण चिंतामन चव्हाण, घोटे सुशील सुरेशराव, राजेंद्र लक्ष्मणराव शिंदे, यशोनिल उत्तमराव मोगले, विशाल छाया उद्धव नांदरकर, प्रशांत रमेश पाटील अवसरमल, नारायण त्र्यंबक सोन्नी, शेख मोहम्मद अख्तर मोहम्मद सादेक, अॅड. गुल्लापेल्ली योगेश दत्तु, डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, मनिषा उर्फ मंदा खरात, प्रतिक्षा प्रशांत चव्हाण, अशोक दत्तात्रय कोल्हे, भाऊसाहेब केशवराव झिरपे, दिलीप हरिभाऊ घुगे, अॅड. विठ्ठल आबाराव कडवे, सतीश भागवत चव्हाण, कृष्णा त्रिंबकराव पवार, अशोक दत्ता हेमके, संदिप देविदास जाधव, सौ. दिपीका बाप्पा उदरभरे, भालचंद्र लक्ष्मण गंगाधरे आणि सिद्दीकी मोहम्मद अशफाकुल हसन यांचा समावेश आहे. 

दि. 7 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, 9 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून, 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow