सचिन पायलटांचे मराठवाड्यात बस्तान, काँग्रेस नेत्यांशी चर्चा
 
                                सचिन पायलटांचे मराठवाड्यात बस्तान, काँग्रेस नेत्यांशी चर्चा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सचिन पायलट यांना विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची जवाबदारी दिली आहे. ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचारात रणनिती आखत आहे. काल नांदेड येथे लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची भरगच्च जाहीर सभेला मिळालेला प्रतिसाद बघता जालन्यात पण सभा होणार आहे. राहुल गांधी व राष्ट्रीय नेत्यांचे जास्तीत जास्त सभा व्हावे यासाठी सचिन पायलट प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे राज्यात 105 जागेवर लढत आहे. मराठवाड्यात जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी प्रभारी सचिन पायलट प्रचाराचे नियोजन करत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार एम.एम.शेख यांनी निवडणुकीच्या विषयावर पायलट यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी मराठवाडा अध्यक्ष हामद चाऊस उपस्थित होते. मराठवाड्यातील 9 जागेवर काँग्रेसचे उमेदवार आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दोन, जालना एक, धाराशिव(उस्मानाबाद) एक, लातूर दोन, परभणी, पाथरी एक, नांदेड दोन जागेवर लढत आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            