सरपंच मंगेश साबळे यांनी भिकारी बनून केले पुन्हा अनोखे आंदोलन...

घरकुल योजनेत 25 हजारांची टक्केवारी मागितल्याचा आरोप; सरपंचाचं 'भीक मागो' आंदोलन, जमा झालेले पैसे तहसीलदार व अभियंत्यांकडे जमा
फुलंब्री, दि.8(डि-24 न्यूज) तालूक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर फाटकी कपडे घालून, हातात भिक्षा पात्र घेऊन 'भीक मांगो' आंदोलन केले. घरकुल योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी 25 हजार रुपयांची टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केला. त्यांनी भिक्षा मागून जे पैसे जमा केले, ते थेट तहसीलदार व अभियंता यांच्या नावाने सुपूर्द करण्यात आले. अनोखे आंदोलन करुन मंगेश साबळे हे नेहमी चर्चेत असतात यावेळी पुन्हा त्यांनी असे आंदोलन करुन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
What's Your Reaction?






