साखर कारखाना कामाचे भुमिपूजन व पक्ष पक्षप्रवेशावर भाजपाची टिका, संचालक तुषार शिसोदे यांनी केले आरोप
 
                                साखर कारखाना कामाचे भुमिपूजन व पक्ष पक्षप्रवेशावर भाजपाची टिका.... सर्व संचालक उबाठा गटात प्रवेश करणार नसल्याची पत्रकार परिषदेत माहिती....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दिशाभूल करुन वेळ घेतली आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेत आहे. असा आरोप कारखान्याचे विद्यमान संचालक तथा माजी चेअरमन व भाजपा सहकार आघाडीचे तुषार पाटील शिसोदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
त्यांनी आरोप लावला की सर्व संचालक उबाठा गटात प्रवेश करणार नाही मी भाजपात आहे भाजपातच राहणार आहे.
त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप लावला संत एकनाथ कारखान्यावर कोट्यवधीचे कर्ज असताना चेअरमन सचिन घायाळ हे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संत एकनाथ साखर कारखाना परीसरात कोट्यवधी रुपयांचे नियोजित विविध प्रकल्पाचे भुमिपुजन करत आहे. ते चुकीचे असून जनतेची दिशाभूल करणारे आहे. ज्या प्रकल्पाचे भुमीपुजंन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे त्या पैकी कुठल्याही प्रकल्पाला शासनस्तरावर परवानगी मिळालेली नाही. साधी एनओसी देखील घेतलेली नाही. तरीही चेअरमन घायाळ हे भुमीपूजन करुन कारखाना सभासद, आणि तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत आहे.
एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या योजनांना फसव्या आहेत असे आपण सातत्याने म्हणतात आणि ह्याच संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या फसव्या प्रकल्पाना आपण अधिकृत मानून त्यांच्या नवीन प्रकल्पाचे भुमिपुजन करण्यासाठी येत आहात. चेअरमन व काही निवडक सदस्य यांना पक्षप्रवेश देता हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत त्यांना शोभते का ? असा प्रश्न तुषार शिसोदे यांनी उपस्थित केला. शेवटी जनता हुशार आहे कुठेतरी पाणी मुरतंय हे आपण बघावं त्यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध नाही परंतु त्यांच्या फसव्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे आमच्या आजोबांनी स्थापन केलेल्या सहकारी साखर कारखाना यांनी आज अधिकृत लुबाडला आहे आणि आता हेच तो विकायला निघाले आहेत आमच्या आजोबांनी स्थापन केलेल्या कारखान्यात 18 हजार सभासदां पैकी बारा हजार सभासद यांनी रद्द केले आहेत. आणि नवीन 6 हजार सभासद केले आहे. तेही कुठले अधिकृत नाहीत आणि त्याच कारखान्याचे नवीन प्रकल्पाचे उद्घाटन आपल्या हस्ते होत आहे हे योग्य नाही अशी भावना माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक तुषार शिसोदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            