सुरेश बनकर यांची भाजपच्या पूर्व जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
भाजप ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुरेश बनकर यांची नियुक्ती
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर, दि.18(डि-24 न्यूज)-
भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पूर्व जिल्ह्याच्या नवीन जिल्हाध्यक्षपदी श्री. सुरेश बनकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश महामंत्री श्री. सुनीलजी राणे यांनी प्रदेशाध्यक्षांच्या वतीने नियुक्तीपत्र प्रदान करून श्री. सुरेश बनकर यांच्या जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली.
या नियुक्तीबद्दल शहराध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांनी श्री. सुरेश बनकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होऊन ग्रामीण पूर्व जिल्ह्यात पक्षाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?