हाॅटेल विटस लिलाव वादात, टक्केवारी घेणा-यांनी मला बदनाम करु नये, मंत्री संजय शिरसाटांचा पलटवार...
 
                                हाॅटेल वीटस लिलाव प्रकरणात माध्यमांसमोर आले मंत्री संजय सिरसाट
संजय राउत यांच्यावर केली टिका...
छत्रपती (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) रेल्वेस्टेशन रोडवरील पंचतारांकीत हाॅटेल विटसची लिलाव प्रक्रीया वादात सापडली आहे. मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिध्दांत शिरसाट यांच्या कंपनीने दिडशे कोटींची किंमत असलेल्या या पंचतारांकीत हाॅटेल 67 कोटीत बोली लावून खरेदी केल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप लावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढे पैसे मुलाकडे कसे आले असाही आरोप राऊतांनी केला. आरोप लागल्यानंतर मंत्री संजय शिरसाट माध्यमांसमोर आले व संजय राऊत यांच्यावर सडकून टिका केली.
मंत्री शिरसाठ यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले हाॅटेल लिलाव काही माझ्यासाठी झाला नाही. हि लिलावाची सातवी वेळ आहे. टक्केवारी घेणा-यांनी मला बदनाम करु नये. असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना प्रत्यूत्तर दिले आहे. राऊतांनी त्यांच्यावर हाॅटेल खरेदी प्रकरणावरुन आरोप केला होता.
रात्रीची उतरली नाही की असे प्रकार घडत असतात. ते रोज बडबड करतात लोकांना त्यांची सवय झाली आहे. हाॅटेल खरेदी प्रकरणात जर काही चुकीचे असेल तर मी समोर येवून सांगू शकतो. पण काही काम कायदेशीर होत असेल तर यांच्यासारख्या टक्केवारी खाणा-या दलालांनी बदनाम करण्याचा प्रयत्न करु नये, मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका हे सर्व रेकाॅर्ड एसडिएमकडून मिळू शकतात. लिलाव काही माझ्यासाठी झाला नाही यापूर्वी देखिल लिलाव झाला होता. काही जणांनी एकत्र येत आपण काही तरी व्यवसाय करु म्हणून या प्रक्रीयेत सहभाग नोंदवला. मराठी माणूस व्यवसायात जात असताना त्याला पाठींबा द्यायचा सोडून त्याच्यावर आरोप करता का...? तुम्हाला लाज वाटत नाही का...? तुमच्याकडे मनपात जे दलाल होते त्यातील एकही मराठी नव्हता, दलालांनो मेहनत करा, कमवा आणि मोठे व्हा. मुलावर झालेल्या आरोपांबद्दल बोलताना शिरसाठ म्हणाले की राजकारणामध्ये खालच्या थराला जाऊन राजकारण करणे योग्य नाही. यात कोण कोण होते मला कसे बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चैन कशी फिरली, याचे उत्तर देणार आहे. मला बदनाम करणारे चेहरे समोर आणणार असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            