10 डिसेंबर रोजी मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन, मोठ्या संख्येने ब्लड डोनेट करण्याचे आवाहन

10 डिसेंबर रोजी मेगा ब्लड डोनेशन कॅम्प
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) अल-फरहान मेडीकल फाउंडेशनच्या वतीने 10 डिसेंबर रोजी मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी युनुस काॅलनी, कटकट गेट येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत कॅम्प सुरू राहणार आहे. आणखी दोन ठिकाणी याच दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प होणार आहे. गांधी भवन, सिल्क मिल काॅलनी, मौलाना हजरत मोहानी लायब्ररी, बायजीपूरा, औरंगाबाद येथे होईल. महिलांसाठी ब्लड डोनेशन करण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. फाऊंडेशनचे हे बारावे ब्लड डोनेशन कॅम्प होणार आहे. या फाऊंडेशनचे आरोग्य क्षेत्रात मोठे काम आहे. गरजू रुग्णांना सेवा देण्याचे सदैव कार्य सुरू आहे.
सन 2012 पासून दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त युवकांनी ब्लड डोनेशन करुन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती अल फरहान मेडीकल फाउंडेशनचे काझी रियाज यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






