5 दिवसांत बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक केली नाही तर लाखोंच्या संख्येने रॅली मुंबईत धडकणार - इम्तियाज जलील
5 दिवसांत बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक केली नाही तर लाखोंची रॅली मुंबईत धडकणार - इम्तियाज जलील
बाबा रामगिरी यांना सावध राहण्याचा दिला इशारा सत्ताधारी त्यांची हत्या घडवू शकतात, नितेश राणे यांना सत्ताधारी पक्षांनी पिल्लू सोडले आहे असले वक्तव्य करा दंगे भडकावण्यासाठी, संविधान पुस्तिका देणार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना, मुंबईतील मुस्लिम नेत्यांना पाठवणार घुंगरू, पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांचा घणाघात....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) बाबा रामगिरी यांच्या विरोधात देशभरात 58 गुन्हे दाखल झाले असताना पोलिसांनी आतापर्यंत त्यांना अटक केली नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे. पोलिस अधिकारी पदावर रुजू होताना जी शपथ त्यांनी घेतली होती ते विसरले का....! त्यांना ती शपथ फ्रेम करून देणार आहे कर्तव्याची आठवण करून द्यायला. ते दंगली होण्याची वाट पाहत आहे का....? पाच दिवसांची वेळ देतो या पाच दिवसांत बाबा रामगिरी व नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई करावी नसता सहाव्या दिवशी मुंबईला लाखोंची रॅली काढण्यात येईल जी कधी महाराष्ट्राने बघितली नसेल अशी भव्य रॅली काढणार. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना संविधान पुस्तिका हातात देऊन राज्य व देश संविधानानुसार चालतो हे दाखवून देण्यासाठी देणार. आम्ही कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. न्यायालयाचे व दुसऱ्यांच्या धर्माचे आदर करतो. सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत असा आरोप करत बाबा रामगिरी यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केले त्याच दिवशी मुख्यमंत्री त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांची पाठराखण करत केसालाही धक्का लाऊ देणार नाही असे वक्तव्य करतात हि राज्याची संस्कृती आहे का...? राज्याचे मुख्यमंत्री कोण्या एका जातीचे धर्माचे नसतात ते माझेही मुख्यमंत्री आहेत. काही ऑर्गनायझेशन न्यायालयात गेले की बाबा रामगिरी यांच्यावर पोलिस अटकेची कारवाई करत नाही न्यायालय म्हणते ते विवादास्पद व्हिडिओ सायबर पोलिसांच्या मदतीने सोशलमिडीतून काढून टाका. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की राज्यात आंदोलन सुरू आहे. कार्यवाहीचे आदेश द्या न्यायालय म्हणते तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही. पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी न्यायालयावर सुध्दा ताशेरे ओढले. एकीकडे सरकार अशी भुमिका घेते न्यायालयात न्याय मिळत नसेल तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. शांततेत रॅली काढण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
बाबा रामगिरी यांना त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी. परंतु हे सत्ताधारी खुर्चीसाठी त्यांची हत्या घडवून आणू शकतात नाव मुस्लिमांचे दाखवायलाही कमी करणार नाही. म्हणून महाराजांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी.
महाविकास आघाडीतील मोठे नेते या प्रकरणावर बोलायला तयार नाही. मुंबईतील मुस्लिम नेते पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन फोटो काढून आपले कर्तव्य संपले असे समजत आहे. मुस्लिम समाजाची मते चालतात परंतु त्यांच्यावर अन्याय झाला तर कोण येणार रस्त्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही आदर करतो त्यांचा पुतळा कोसळला आम्ही निषेध केला. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागेपुढे करणारे मुस्लिम नेत्यांना घुंगरू पाठवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत टिका केली.
नितेश राणे यांना इम्तियाज जलील यांनी (दिड फुट्या) म्हणत म्हणाले हे महाशय कधी पोलिसांविरुद्ध बोलतात तर अहेमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम विरोधी वक्तव्य त्यांनी केले त्यांना असले वक्तव्य करण्यासाठी भाजपने(पिल्लू )त्यांना सोडले आहे. अगोदरच बाबा रामगिरी यांच्यावर कारवाई झाली असती तर असले वक्तव्य करण्याची हिंमत नितेश राणे यांची झाली नसती. राणे यांच्यात हिंमत असेल तर मस्जिद कडे येण्याअगोदर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत फक्त चक्कर मारावी त्यांचेच लोक किती चोप देतील कळेल मग आमच्याकडे येण्याचा विचार करावा. दुस-यांच्या धर्माविरुद्ध हे वक्तव्य करत आहे आम्ही सर्व धर्मांचा व न्यायालयाचे आदर करतो. राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. सत्ताधारी पक्षांनी लक्षात घ्यावे आज सत्ता आहे यानंतर असेल किंवा नाही हे लक्षात ठेवावे. एकामागून एक घटना घडत आहेत यामध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. आम्ही संयम धरला याचा अर्थ असा नाही आम्हाला बोलता येत नाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात सहन केले जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. जनतेला न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर येऊन न्याय मागू पण कायद्याच्या चौकटीत. या दोघांवर कायदेशीर कारवाई झाली नाही असले वक्तव्य करण्यासाठी प्रतिबंध लावला नाही तर राज्यभर जन आंदोलन छेडण्याचा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीला 8 सप्टेंबर पर्यंत मुदत....
आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीला ऑफर दिली होती. काही नेत्यांसोबत चर्चा केली परंतु आतापर्यंत त्यांनी याबाबत निर्णय कळवला नाही. आम्हाला किती जागा द्यायची असली कोणतीही अट नव्हती. आमची राज्यात ताकत आहे. हे त्यांना कळायला हवे. 8 सप्टेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. महाविकास आघाडीने अगोदर निर्णय घ्यावा नसता एकला चलो ची भुमिका आम्ही घेणार आहे. इच्छूकांचे अर्ज मागवण्यात येणार आहे. यानंतर पराभव झाला तर बेछूट आरोप करायचे नाही, एमआयएमच्या उमेदवारांमुळे आमचा उमेदवार पडला असा आरोप करतात म्हणून हा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, समीर साजिद बिल्डर, कुणाल खरात यांची उपस्थिती
होती.
What's Your Reaction?