इम्तियाज जलील यांची मनपाला चेतावनी, हाॅकर्स झोनसाठी एमआयएम अक्रामक...!

इम्तियाज जलील यांची मनपाला चेतावनी, हाॅकर्स झोनसाठी एमआयएम अक्रामक...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) महानगरपालिकेचा कायदा म्हणतो हाॅकर्स झोन निर्माण करुन सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मनपा प्रशासनाचे आहे. हातगाडी रस्त्यावर बाधा आणत नाही तर त्यांच्यावर कारवाई करुन हातगाडी व साहित्य जप्त करण्याची कारवाई केली तर एमआयएमच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल.
हाॅकर्ससाठी हाॅकर्स झोन दिले असते तर कार्यवाईची वेळ आली नसती. गरीबांवर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. पवित्र रमजान महीना सुरू होणार आहे. फळविक्रेते भाजी विक्रेते यांना सन्मानाने व्यवसाय करता यावे यासाठी मनपाने नियोजन करावे नसता मोठे आंदोलन केले जाईल. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत सरकार या गरीब हाॅकर्सना अर्थसहाय्य केले जात आहे. दुसरीकडे मनपा प्रशासन कार्यवाही करत आहे त्यांचे व्यवसाय उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग स्वनिधीचे कर्जफेड हे गरीब लोक कसे करणार. 14 हजार हाॅकर्सची नोंद मनपात केली आहे. त्यांना सुविधा मिळत नाही. स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची चौकशी केली तर अर्धे बोगस निघतील असा आरोप धरणे आंदोलनात भाषण करताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
मनपा मुख्यालयासमोर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हाॅकर्सच्या विविध मागणीसाठी आंदोलन केले. शहरातील विविध ठिकाणी पथविक्रेत्यांवर वारंवार होत असलेली कारवाई थांबवावी. जीवो टॅग बायोमेट्रिक प्रणालीद्वारे 2019 मध्ये एकूण 14198 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांना पथावरती जागा मार्कींग करुन जागा निश्चित करावे. पथविक्रेत्यांना परवाना व ओळखपत्र द्यावे. पथविक्रेत्यांचे जप्त केलेले साहित्य परत करावे. पथविक्रेत्यांसोबत माजी सैनिकांची होत असलेली दादागिरी थांबवावी. महीलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या माजी सैनिकांवर बडतर्फीची कारवाई करावी, पथविक्रेत्यांसाठी मंडळ स्थापन करावे, महाला पथविक्रेत्यांना जागेवर स्वरक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, त्यांच्या पाल्यांना शिक्षण व आरोग्य सुविधा द्याव्यात, त्यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा प्रशासकांना शिष्टमंडळाने केली आहे.
याप्रसंगी नासेर सिद्दीकी, समीर साजिद बिल्डर, शारेक नक्शबंदी, एड कुणाल खरात, असरार अहेमद, जमीर अहमद कादरी, अयूब जहागिरदार,
शेख अहेमद, मोनिका मोरे, प्रांतोष वाघमारे, विकास एडके, आरेफ हुसेनी, हाजी इसाक खान, फेरोज खान, जफर बिल्डर, अब्दुल रहीम उर्फ अज्जू नाईकवाडी, राजु हिवराळे, भाई इम्तियाज, शेख शोएब, अजहर पठाण, अक्षय दांडगे, शेख अल्ताफ व मोठ्या संख्येने पथविक्रेते उपस्थित होते.
What's Your Reaction?






