इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे यांची ईदनिमित्त गळाभेट, एकमेकांना दिली शुभेच्छा

इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे यांची गळाभेट, ईदनिमित्त दिली शुभेच्छा, खैरेंनी ईदगाहमध्ये उपस्थित राहून ईदनिमित्त दिले मुस्लिम बांधवांना शुभेच्छा... अफसरखान यांनीही दिले शुभेच्छा....
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) छावणी ईदगाहमध्ये ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी हजेरी लावली. नमाज नंतर खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा गळाभेट घेण्यासाठी व्यासपीठावर आले. दोन्ही नेत्यांशी हस्तांदोलन करत होते. यावेळी स्वतः हुन इम्तियाज जलील यांनी खैरेंची गळाभेट घेतली. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया न देता खैरेंनी काढता पाय घेतला. यावेळी इम्तियाज जलील यांनी सांगितले मी स्वतः खैरेंची भेट घेतली. हि भारतीय संस्कृती आहे. मी सुद्धा सर्व जाती धर्मातील लोकांच्या सणानिमित्त जात असतो. खैरे हे यावेळी इदगाह वर आले हि चांगली गोष्ट आहे. यावरून असे दिसते की निवडणूक हिंदू मुस्लिम या मुद्यावर न होता विकासाच्या मुद्यावर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. खैरे ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचे स्वागत आहे भाजपाचे नेतेही आले असते तर स्वागत केले असते. खैरे हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत त्यांचा मी आदर करतो. निवडणूका येतात आणि जातात त्यामध्ये कोणी हारतो कोणी जिंकतो पण भारतीय संस्कृती, भाईचारा टिकला पाहिजे असे मला वाटते.
What's Your Reaction?






