ईद-उल-अजहा(बकरी ईद) बाबत समज गैरसमज... इंजिनिअर वहिद यांच्या लेखणीतून...!

 0
ईद-उल-अजहा(बकरी ईद) बाबत समज गैरसमज... इंजिनिअर वहिद यांच्या लेखणीतून...!

ईद-उल-अजहा (बकरी ईद )बाबत महत्वाचे...

(समज /गैर समज )

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).....

बकरी ईद -सणाला हल्ली काही जातीवादी मानसिकतेचे लोक हे सामाजिक विषमतेच्या दृष्टिकोनातून बघत असताना दिसू लागले ही एक वास्तवाविकता असून शोकांतिका सुद्धा आहे.आश्यर्य कारक आहे.

भारत हा विविध धर्म, संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. येथे प्रत्येक धर्माचा सण केवळ त्या समाजापुरता मर्यादित नसून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा असतो. मुस्लिम समाजातील पवित्र आणि महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजे ईद-उल-अजहा. फक्त भारतातील ग्रामीण भागात या सणाला “बकरी ईद” म्हणून संबोधले जाते. 

तीन धर्माचे प्रेषित (यहूदी, ख्रिशन, इस्लाम )यांनी 15000 वर्षा पूर्वी भगवंताच्या आज्ञा होती म्हणून कुर्बानी दिली तेव्हापासून कुर्बानी दिली जाते.भगवंतप्रेषित इब्राहिम अलै सलाम ज्यांना यहूदी(इस्राईली )धर्माचे लोक प्रेषित मानतात,ख्रिशन व मुस्लिम धर्माचे लोक सुद्धा प्रेषित मानतात त्याचे कारण ही सिद्ध व सत्य आहेत ते असे की त्याच्या 40 पिढ्या यहूदी धर्माचे पालन करायचे नंतर 41 व्या पिढीत येशू ख्रिस्त यांनी जन्म घेतला. ख्रिश्चन धर्म उदयास आला. जगभरात मोठी फूट झाली. काही मूर्तिपूजक गट निर्माण झाला. (मुख्यत्वे अरबी राष्ट्रातील). ते सुद्धा आपल्या मूर्ती समोर कुर्बानी द्यायचे.. परत 40 पिढ्या नंतर 41व्या मूर्तिपूजक पिढीत प्रेषित मुहम्मद सलल्लाहो अलैव सल्लम यांनी जन्म घेतला व अरब राष्टात इस्लाम धर्माची स्थापना केली.ईद उज जुहा चा दीनी कुर्बानी ही प्रथा असून कुर्बानी म्हणजेच ईद साजरी करणे असे नव्हे.

प्रथम प्रेषित इब्राहिम ते अंतिम प्रेषित मुहम्मद (स. अ.स.)ते आजपर्यंत असा 15000 वर्षाचा कुर्बानी प्रथेचा आस्था प्रवास आहे.

 काही लोकांनी या सणाकडे केवळ प्राण्यांच्या कुर्बानीच्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली. परिणामी समाजात टीका, गैरसमज दिसतात.

परंतु प्रत्यक्षात ईद-उल-अजहाचा मूलभूत संदेश हा त्याग, श्रद्धा, आज्ञापालन आहे. हा सण केवळ “कुर्बानी”पुरता मर्यादित नसून माणसाने आपल्या स्वार्थ, अहंकार, वाईट प्रवृत्ती आणि लोभावर मात करण्याचा संदेश देतो.

“ईद-उल-अजहा” म्हणजे नेमके काय? हे समजून घेणे महत्वाचे आहे.

“अजहा” या अरबी शब्दाचा अर्थ आहे — त्याग किंवा बलिदान.

ईद-उल-अजहा हा

यहूदी ख्रिशन इस्लाम धर्मा नुसार, अल्लाहने पैगंबर इब्राहिम यांची परीक्षा घेतली. त्यांना आपल्या अत्यंत प्रिय मुलाचा त्याग करून एकांतवास मध्ये मुलाला आणून त्याची कुर्बानी करा असा आदेश दिला. ते पालन करतात किंवा नाही याची परीक्षा होती.त्यांनी लहान मुलाला कुर्बानी साठी सांगितलेल्या जागी आणले त्यावेळेस त्यांना हातात सूरी घेऊन मुलाच्या मानेवर सूरी चालवीण्याचे आदेशीत होताच त्यांचे हाथ थरथरू लागले पण त्यांनी देव आदेश पालन म्हणून सूरी चालविली त्यावेळेस चमत्कार झाला त्याच्या मुलाच्या ठिकाणी बकरा कुर्बान झाला आणि डोळ्याला पट्टी बांधलेला मुलगा सुरक्षित राहिला . हा प्रसंग मानवाला शिकवतो की ईश्वरनिष्ठा, आणि सर्वोच्च समर्पण हे जीवनातील अंतिम सत्य आहे.

ईद-उल-अजहाच्या वेळी बकरीची कुर्बानी देतात म्हणून सामान्य बोलचालीत “बकरी ईद” हे नाव रूढ झाले.गायीची बैलाची कुर्बानी करण्यासाठी कोठेही उल्लेख नाही ती केलीच तर दुय्यम मानली जाते कारण प्रेषित इब्राहिम यांच्या दैवीक चमत्कार च्या वेळेस दुम्बा (बकरा ) ची कुर्बानी झाली.

परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की:

ईद-उल-अजहा म्हणजे केवळ मांसाहार किंवा प्राण्यांची कत्तल असा संकुचित अर्थ नसून प्रेषित इब्राहिम यांनी भगवान आज्ञा पालनास्तव जी त्यागाची तयारी दर्शविली त्याची आठवण करणे हा आहे.

जसे दिवाळीचा अर्थ फक्त फटाके नसतो, होळीचा अर्थ फक्त रंग नसतो किंवा गणेशोत्सवाचा अर्थ फक्त मिरवणूक नसतो; त्याचप्रमाणे ईद-उल-अजहाचाही अर्थ फक्त कुर्बानी नाही.फक्त 25 ते 30%लोक आप आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार कुर्बानी देतात.

      निसर्ग प्राणी समतोल अभ्यास व संशोधन, कोलकत्ता या संस्थे च्या अहवाला नुसार दर रोज ची मांसाहार गरज भगवीण्यासाठी भारतात दर रोज 1. 2 ते 1.5 लाख 

 बकरे कापले जातात. बकरा उद्योग मध्ये भारतात दररोज 300 कोटी ची उलाढाल होते. 

लोकसंख्या 140 कोटी पैकी मांसाहार करणारे 75 कोटी जनतेपैकी 15 कोटी मुस्लिम आहेत.

जर भारतात मांसाहार गरज भागविण्यासाठी महिन्याकाठी 50 लाख बकरे कापली जातं असतांना ईद च्या दिवशी धार्मिक विधि कुर्बानी साठी कापल्या जाणाऱ्या 20 ते 25 लाख बकरा कुर्बानीच्या विरोधात राजकीय रंग देण्याचा प्रयत्न का? या मध्ये राजकारण निर्माण करून काही राजकीय पार्टी केवल द्वेष निर्माण करीत आहे.कष्टाच्या रक्कमतून बकरा खरेदीकरून कुर्बानी करणाऱ्या मुस्लिम लोकांबाबत जे तिरस्कार जातीभेद निर्माण करतात त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा केवल मुस्लिमच मटण खातात का?भारतातील जवळपास 300 जत्रेमध्ये सुद्धा कंदोरी (कुर्बानी ) दिली जाते मग बकरी ईद सणाबाबत सोशलमीडिया वर जातीवादी भूमिका का?

              इंजि. शेख वहीद 

             (छ. संभाजीनगर )

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow