ईव्हिएम विरोधात आंदोलकांनी ईव्हिएम प्रतिकृतीचे दहन करत आंदोलन अक्रामक करण्याचा इशारा

ईव्हिएम विरोधात आंदोलकांनी ईव्हिएम प्रतिकृतीचे दहन करत आंदोलन अक्रामक करण्याचा इशारा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) 'आम्ही भारताचे लोक ' या बॅनरखाली गेल्या 40 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या ईव्हीएम हटाव संविधान बचाव आंदोलनाच्या ठिकाणी आज लोकशाही आणि देशासाठी घातक ठरणाऱ्या ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. पंडित गायकवाड यांच्या नेतृत्वात गेली 40 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. यावेळी भूमिपुत्र जनपार्टी पक्षाचे नेते मधुकर भोळे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. महादेव आंधळे, संविधान अभ्यासक अनंत भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ऍड. महादेव आंधळे म्हणाले की सध्याचा निवडणूक आयोग हा सरकारच्या ताटा खालचे मांजर बनले असून ते जनतेच्या मताला काहीही किंमत देत नाही. त्यामुळे आपली मागणी रेटण्यासाठी अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांनी लोकांच्या भावनेचा आदर करावा कारण लोकशाहीत जनताच सर्व श्रेष्ठ आहे असे मत मधुकर भोळे यांनी मांडले. लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करून ईव्हीएम हटविण्याची प्रखरतेने लढा उभारला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. जोरदार घोषणाबाजी करीत ईव्हीएम मशिनच्या प्रतिकृती जाळण्यात आल्या, यावेळी अशोक जायभाये, रामराव दाभाडे, विष्णू वाखारे, राजू भालेराव, सिद्धार्थ हिवराळे, राजश्री देबाजे, श्रीमती बनकर आदींची उपस्थिती होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ईव्हिएम मशीन वर घेण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुका
महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिति, ग्रामपंचायतचे निवडणूका आता तरी मत पात्रिका वर घेण्यात यावे या मागणी साठी पंडीत गायकवाड़ हे बेमुदत साखळी उपोषण करीत आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय दिल्ली गेट समोर बेमुदत उपोषणाला चाळीस दिवस होत आहे. अनेक पत्रकार, वकील, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
What's Your Reaction?






