तहसीलदार रमेश मुनलोड प्रकरणात कार्यवाही, महसूल संघटनेचे आंदोलन स्थगित...!

तहसीलदार रमेश मुनलोड प्रकरणात कार्यवाही, महसूल संघटनेचे आंदोलन स्थगित....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) येथे तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्यासोबत झालेल्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पोलीस आयुक्त प्रवीण पवार या दोघांच्या तत्परतेने व समन्वयाने सदर घटनेची तातडीने चौकशी करण्यात आली. सदर
प्रकरणात दोषी असलेले ड्युटी ऑफिसर पीएसआय श्री पासलकर यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले. जीन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा चार्ज काढून इतर ठिकाणी बदली करण्यात आली. सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून एसीपी दर्जाचे अधिकारी चौकशी करत आहेत.
सदर प्रकरणात दरोडा व शासकीय कामात अडथळा अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले. तसेच प्रकरणातील 6 आरोपी अटक करण्यात आले असून ईतर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदर प्रकरणी महसूल मंत्री यांनी स्वतः विशेष लक्ष घालून तत्परता दाखवून संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आलेले होते त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी घेतलेल्या दखली बाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेमार्फत आभार व्यक्त करण्यात येते.
सदर प्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेतलेले आहे व महसूल विभागाला न्याय दिलेला आहे त्यांचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
त्यासोबत तत्परतेने माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुद्धा समन्वय साधून सदर प्रकरणात कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा शतशः आभार म्हणण्यात येत आहे. सदर प्रकरणात पोलीस उपायुक्त गृह शीलवंत नांदेडकर, डीसीपी बगाडे व इतर पोलीस अधिकारी यांनी सुद्धा तत्परता दाखवून तात्काळ कार्यवाही केलेली आहे. त्यांचे सुद्धा आभार मानण्यात येते.
सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने पुकारण्यात आलेले आंदोलन वरील कार्यवाही समाधानकारक झालेली असल्यामुळे आंदोलन रद्द करण्यात येत आहे.
सदर बाबतीची सूचना जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. तसेच राज्य कार्यकारणी यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून सदरील निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात सर्व वाहिन्यांचे पत्रकार तसेच सर्व प्रिंट मीडिया यांनी सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद.
सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे सर्व राज्य पदाधिकारी विशेषतः कार्य अध्यक्ष माननीय सुरेश बगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचे ईतर पदाधिकारी सर्वांचे आभार..
त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्यांचे आभार
येथून पुढे सर्व महसूल अधिकारी यांनि पोलीस विभाग व इतर विभागाशी समन्वय साधून जास्तीत जास्त कामे लोकोपयोगी कामे करावे असे निर्देशित करण्यात येते व विनंती करण्यात येते. त्याचबरोबर पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी व संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे सुद्धा आभार मानण्यात येते.
What's Your Reaction?






