एकही ठराव मंजूर न होता शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली...दोन लाख पाण्यात
एकही ठराव मंजूर न होता शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली ... दोन लाख रुपये पाण्यात....
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) शिक्षकांची पतसंस्था ग्रामीण वार्षिक सर्वसाधारण सभा गुलाब विश्व हॉल टीव्ही सेंटर या ठिकाणी अत्यंत उशिराने सुरू झाली (दहा वाजता सुरू होणार होती) या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र वाणी, शिक्षण संचालक हे उपस्थित होते. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली पालक आणि पाल्यांचा सत्कार सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या सत्रात सभा तीन वाजता सुरू होतातच संचालक मंडळाने तीन ठराव सभेसमोर आणले ठेव एक हजार रुपये वरून बाराशे रुपये करण्यात यावी. कल्याण निधी दोनशे रुपयांवरून पाचशे रुपये करण्यात यावा. पतसंस्थेतील संचालक तेरा वरून 17 करण्यात यावे. नवीन सभासद प्रोसेसिंग फीस 5000 रुपये वरून 1000 करण्यात यावा. हे ठराव होते. सभागृहांनी एकाही ठरावाला मंजुरी न देता संचालक मंडळांनी सभा गुंडाळली या सभेसाठी कमीत कमी दोन लाख रुपये पतसंस्थेचा खर्च झाला परंतु सभासदाच्या हिताचा एकही निर्णय झाला नाही. ठराव चुकीचे आणल्यामुळे सभासदांनी ठरावाला मान्यता दिली नाही पर्यायने गोंधळ सुरू झाला शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी जेवण देऊ नये, व्याजदर आठ टक्के करावा अशी मागणी केली होती परंतु संचालक मंडळाच्या गोंधळामुळे ठराव पास करून घेता आले नाही परंतु दोन लाख रुपये पतसंस्थेचे पाण्यात गेले. यासभेत कडूबा साळवे, बबन चव्हाण, विलास बापू चव्हाण, प्रवीण गायकवाड, दिलीप ढाकणे, जगन्नाथ मुरुमे, दीपिका एरंडी आदींनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजात भाग घेतला. या सर्वसाधारण सभेला दोनशे ते अडीचशे शिक्षकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?