औरंगाबाद जिल्ह्यातील टक्केवारी व मतमोजणीची तयारी
जिल्ह्यात सरासरी 69.64 टक्के मतदान; मतमोजणीसाठी सज्जता
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(जिमाका)- विधानसभा निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघात मिळून एकूण 69.64 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आज आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते.
मतदान प्रक्रिया आटोपून, सर्व मतदान यंत्रे इ. सहसाहित्य स्ट्रॉंग रुम मध्ये जमा करण्यात आले. हे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करुन माध्यमांना माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय (सन 2024 मध्ये) मतदान टक्केवारी याप्रमाणे-
104- सिल्लोड-80.08 टक्के, 105- कन्नड-69.31 टक्के, 106- फुलंब्री-72.22 टक्के, 107-औरंगाबाद मध्य-59.35 टक्के, 108-औरंगाबाद पश्चिम-60.58 टक्के, 109-औरंगाबाद पूर्व-60.63 टक्के, 110- पैठण-77.53 टक्के, 111- गंगापूर-73.77 टक्के, 112- वैजापूर-75.94 टक्के. असे एकूण सरासरी 69.64 टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यात एकूण 16 लाख 63 हजार 186 पुरुष मतदारांपैकी 11 लाख 78 हजार 617 जणांनी मतदान केले. तर 15 लाख 39 हजार 421 महिला मतदारांपैकी 10 लाख 51 हजार 677 महिलांनी मतदान केले. तर इतर मतदारांमध्ये 144 जणांपैकी 40 जणांनी मतदान केले. एकूण 32 लाख 2 हजार 751 मतदारांपैकी 22 लाख 30 हजार 334 मतदारांनी मतदान केले. पुरुषांची मतदानाची टक्केवारी 70.87 तर महिलांची टक्केवारी 68.32 इतर मतदारांची टक्केवारी 27.78 टक्के होती. एकूण सरासरी टक्केवारी 69.64 टक्के आहे.
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत झालेले मतदान याप्रमाणे-
सन 2019 मध्ये जिल्ह्यात 28 लाख 54 हजार 281 मतदार होते. त्यात 15 लाख 5 हजार 276 पुरुष, 13 लाख 48 हजार 979 महिला व 26 इतर मतदार होते. त्यावेळी यापैकी 10 लाख 24 हजार 672 पुरुष, 8 लाख 49 हजार 708 महिला व इतर 5 असे एकूण 18 लाख 74 हजार 385 जणांनी मतदान केले होते. एकूण टक्केवारी 65.67 होती.
सन 2019 मध्ये मतदार संघनिहाय झालेले मतदान याप्रमाणे-
104- सिल्लोड- 2,36,736,- 74.83 टक्के
105-कन्नड- 2,14,400- 68.25 टक्के.
106-फुलंब्री- 2,27,164- 69.68 टक्के.
107-औरंगाबाद मध्य- 1,92,805- 59.19 टक्के.
108-औरंगाबाद पश्चिम-1,98,182- 59 टक्के
109-औरंगाबाद पूर्व- 1,94,381,- 60.9 टक्के.
110-पैठण- 2,12,495,- 72.3 टक्के.
111-गंगापूर- 2,02,752- 64.72 टक्के.
112-वैजापूर- 1,95,470- 63.1 टक्के.
विधानसभा मतदारसंघनिहाय (सन 2024)मतदानाची‘महिला,पुरुष व इतर’ निहाय विगतवारी-
104- सिल्लोड-पुरुष-1,50,585,महिला-1,36095,इतर-2, एकूण मतदान- 2,86,682.
105- कन्नड-पुरुष-1,22,519, महिला -1,08,099,इतर-४,एकूण मतदान- 2,30,622
106- फुलंब्री-पुरुष-1,41,528,,महिला-1,26,176,इतर-2एकूण मतदान- 2,67,706.
107- औरंगाबाद मध्य-पुरुष-1,14,983, महिला-1,03,978,इतर-5,एकूण मतदान- 2,18,966.
108- औरंगाबाद पश्चिम-पुरुष-१,३०,०१७,महिला-1,16,606,इतर-15,एकूण मतदान- 2,46,638.
109- औरंगाबाद पूर्व-पुरुष-1,14,104,महिला-1,00,921,इतर-4,एकूण मतदान- 2,15,029.
110- पैठण-पुरुष- 1,33,964१,महिला-1,18,273, इतर-०,एकूण मतदान- 2,52,237.
111- गंगापूर-पुरुष-1,41,730,महिला-1,27,337, इतर-८,एकूण मतदान- 2,69,075.
112- वैजापूर-पुरुष-1,29,187,महिला-1,14,192, इतर-०,एकूण मतदान- 2,43,379
मतदान केंद्रावरील आरोग्य सेवेचा 9479 जणांना लाभ
प्रत्येक मतदान केंद्रस्थळी आरोग्य सेवांसाठी आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या सेवांचा लाभ 8324 मतदारांनी घेतला तर 1155 मतदान कर्मचाऱ्यांनी अशा एकूण 9479 जणांनी लाभ घेतला. दरम्यान मतदान प्रक्रियेत 34 कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी 8 जणांना खाजगी रुग्णालयात तर 26 जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मतमोजणीसाठी सज्जता
शनिवार दि.23 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची सज्जता झाली आहे. आजच मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण करण्यात आले. इव्हीएमसाठी 126 टेबल असतील , टपली मतपत्रिकांसाठी 70 टेबल असतील तर ईटीपीबीएस साठी 12 टेबल असतील, अशी माहिती देण्यात आली. 852 मतमोजणी कर्मचारी , 242 सुक्ष्म निरीक्षक व 3000 पोलीस कर्मचारी असे 5778 मनुष्यबळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्या या प्रमाणे- सिल्लोड-29, कन्नड-27, फुलंब्री-27, औरंगाबाद मध्य-23, औरंगाबाद पश्चिम -28, औरंगाबाद पूर्व-24, पैठण-26, गंगापूर-27, वैजापूर-26.
मतमोजणी कालावधीत व मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोनद्वारे, सीसीटिव्ही द्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत 6 केंद्रीय बल गट तर 2 राज्य राखीव पोलीस बल गट जिल्ह्यात तैनात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.
What's Your Reaction?