काँग्रेसचा स्वबळाचा नारा, अल्पसंख्यांक विभागाच्या मेळाव्यात सूर...

 0
काँग्रेसचा स्वबळाचा नारा, अल्पसंख्यांक विभागाच्या मेळाव्यात सूर...

चुका सुधारा, तिकीट देवू परंतु पक्ष संघटन मजबूत करा - डाॅ.वजाहत मिर्झा

काँग्रेस अल्पसंख्यांक मेळाव्यात शक्ती प्रदर्शन, मेळाव्यात खचाखच भरले गांधीभवन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) -

देशात द्वेषाचे राजकारण सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजाचे हक्क अधिकारावर गदा आणली जात आहे. व्यवसायांवर संकटे येत आहे. कुरेशी समाजाला व्यवसाय करण्यासाठी त्रास दिला जात आहे. सरकार अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी गांभिर्याने घेत नाही उलट त्रास देणे सुरु आहे. काँग्रेस अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व संविधानाने जो अधिकार दिले बाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेस सर्व समाजाला सोबत घेवून पुढे जात आहे. लोकसभेत काँग्रेसला चांगले यश मिळाले परंतु विधानसभेत जिंकण्याचा आत्मविश्वास होता परंतु पराभव कसा झाला कळलेच नाही परंतु कार्यकर्त्यांनी न डगमगता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे. निवडणूका झाल्यानंतर बघू कोणासोबत जायचे आहे. आगामी काळात महापालिकेच्या निवडणूका आहेत. आज जसा उत्साह मेळाव्यात कार्यकर्त्यांचा दिसत आहे. तसाच उत्साह निवडणूकी पर्यंत राहीला तर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. भाजपा शिवसेना व एमआयएमला शहरातील जनतेने संधी दिली आता काँग्रेसला संधी द्या शहराचा सर्वांगिण विकास व दररोज पाणी देवू. अल्पसंख्यांक समाजातील वोटींग बुथचे सर्वेक्षण करा तेथे पक्षसंघटना मजबुत करा. तिकीट देवू पण जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एकजुटीने काम करा स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन काँग्रेस प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष डाॅ.वजाहत मिर्झा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केले.

आज दुपारी गांधी भवन येथे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिस पटेल व शहराध्यक्ष मोईन इनामदार यांनी या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन केले. यावेळी गांधी भवन खचाखच भरले होते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. वजाहत मिर्झा यांनी त्यांचे भव्य स्वागत करत शब्द दिला पक्ष तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिल पक्षाशी एकनिष्ठ असणा-यांना तिकीट देवू परंतु निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागा असे आश्वासन दिले.

मेळाव्यात व्यासपिठावर राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी अहेमद खान, शहराध्यक्ष शेख युसुफ, जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, खालेद पठाण, युसुफ अन्सारी, गुलाब पटेल, इक्बाल सिंग गिल, कैसर आझाद, मुदस्सर अन्सारी आदी उपस्थित होते. मेळाव्यात सुत्र संचालन डाॅ.अरुण सिरसाठ यांनी केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती इंजि.इफ्तेखार शेख, बबन डिडोरे पाटील, मोईन कुरेशी, अनिता ताई भंडारी, परवीन देशमुख, रेखाताई राऊत, उमाकांत खोतकर, शेख रईस, अस्मत खान, असदुल्लाह शकील, अनिल पारखे, मजाज खान, विद्याताई घोरपडे, शकुंतला साबळे, रेहाना शेख, राहुल संत, सरोज जेकप, जकी मिर्झा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow